वस्तीवरच्या मुलांसाठी तो बनला ‘गुरुजी’, 14 वर्षीय ओमकारकडून चिमुरड्यांना ज्ञानार्जन

आठवीत शिकणाऱ्या ओमकार कोल्हे या मुलाने वस्तीवरील मुलांसाठी दररोज शाळा भरवायला सुरवात केली असून चक्क तो लहान मुलांना ज्ञानार्जन देण्यासाठी गुरुजी बनला आहे.

वस्तीवरच्या मुलांसाठी तो बनला 'गुरुजी', 14 वर्षीय ओमकारकडून चिमुरड्यांना ज्ञानार्जन
बीडच्या ओमकार कोल्हेचं ज्ञानार्जन
महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: Akshay Adhav

Jul 28, 2021 | 11:25 AM

बीड : कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. या वर्षी तरी मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरवातीपासुन सुरु राहावे यासाठी देवी निमगांव जिल्हा परिषद शाळेअंतर्गत येणाऱ्या कोल्हेवस्तीच्या एका तरुणाने अनोखा उपक्रम हाती घेतलाय. आठवीत शिकणाऱ्या या मुलाने वस्तीवरील मुलांसाठी दररोज शाळा भरवायला सुरुवात केली असून चक्क तो लहान मुलांना ज्ञानार्जन देण्यासाठी गुरुजी बनला आहे. या गुरुजींचं नाव आहे ओमकार कोल्हे…! (Omkar Kolhe 14-year-old from Beed teaches children)

14 वर्षांच्या ओमकारचं ज्ञानार्जन

आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील जिल्हा परिषद शाळेअंतर्गत येणाऱ्या कोल्हे वस्ती येथे सात विद्यार्थी आहेत. दुसरी व चौथी इयत्तेत ते शिकत आहेत. सध्या मागील वर्षांपासून शाळा बंद यंदा यंदाच्या वर्षी तरी अभ्यासक्रमाला सुरुवात व्हावी म्हणून वस्तीवरील इयत्ता आठवीत शिकणारा चौदा वर्षाचा तरूण ओमकार गणेश कोल्हे यांनी वस्तीवरच एका घरात फळा, खडू, बसण्यासाठी चटई, हे उपलब्ध करून वस्तीवरील मुलांना सर्व विषयाची सोपी मांडणी करून शिकवत आहे. त्याच्या उपक्रमाचे सध्या कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.

वस्तीवरील पोरांना एकत्र जमवून शिकवतो

सध्या शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण वाया जाऊ नये म्हणून ऑनलाईन अभ्यासासाठी नेटवर्क नसतं. या गावात नेटवर्क नाहीये. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ओमकार सगळ्या वस्तीवरील पोरांना बोलवून रोज शिकवत आहे. आम्हाला यात आनंद वाटत असल्याचे ग्रामस्थ सांगतायत.

ओमकारच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक

राज्य शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. मात्र शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील दुर्गम वस्त्यांवर शिक्षण विभाग अद्याप पोहोचलेच नाही. त्यामुळे या कोरोनस काळात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. अशातच कोल्हेवस्तीवर आठवीत शिकणारा विद्यार्थी थेट गुरुजी बनून गावातील विद्यार्थ्यांना एक महिन्यापासून ज्ञानार्जनाचे धडे देत आहे. ओमकारच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

(Omkar Kolhe 14-year-old from Beed teaches children)

हे ही वाचा :

नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे 301 अभ्यासक्रम

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी परीक्षा होणार, नेमकं कारण काय?

HSC Result 2021: बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता? सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचं पालन करावं लागणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें