जे आम्हाला सोडून गेले, त्यांची जनतेने सुट्टी केली; शरद पवारांचा पक्षांतर करणाऱ्यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. (People who left NCP have not been accepted, says sharad pawar)

जे आम्हाला सोडून गेले, त्यांची जनतेने सुट्टी केली; शरद पवारांचा पक्षांतर करणाऱ्यांना टोला
sharad pawar

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. जे लोक आम्हाला सोडून गेले, त्यांची जनतेने सुट्टी केली, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधताना हे विधान केलं. मधल्या काळात राष्ट्रवादीला सोडून अनेकजण जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीवर भरपूर छापून येत होतं. राष्ट्रवादीच्या भवितव्यावरही चिंता व्यक्त केली जात होती. पण जे आम्हाला सोडून गेले. त्यांची जनतेनेच सुट्टी केली, असा टोला पवार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचाय

निवडणुकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश आलं. पण सरकार बदलण्याची स्थिती नव्हती. रोज आम्ही पाहत होतो. आज होईल उद्या होईल. असं वाटत होतं. आम्ही थंड डोक्याने बसलो होतो. कारण हे लोक जाऊन कुठे जाणर हे आम्हाला माहीत होतं, असंही त्यांनी सांगितलं. हे सरकार आपल्याला टिकवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे राज्य चुकीच्या हाती द्यायचं नाही. त्यांचा अनुभव चांगला नाही. म्हणून आम्ही एकत्र आलो, असं त्यांनी सांगितलं.

या सरकारला जागा दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही

या देशातील 60 टक्के शेतकरी काळ्या मातीशी इमान राखतो. शेतकऱ्यांच्या हिताला आपलं समर्थन आहे. आमची शेतकऱ्यांना साथ आहे. मात्र, शेतीमालाच्या किंमतीसंबंधी गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहे. शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसला आहे. पण देशातील केंद्र सरकार एक वर्षापासून या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. शेतकऱ्यांना भाजप नेत्यांच्या गाड्यांनी चिरडले आहे. त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या सरकारला त्यांची जागा दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही, असं सांगतानाच भाजपची नीती शेतकरी विरोधी आहे, असं त्यांनी सांगितलं.

ईडीवरून टीका

दरम्यान, सकाळीही पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.

निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

 

संबंधित बातम्या:

अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं, शरद पवारांची हाक

पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला

(People who left NCP have not been accepted, says sharad pawar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI