बीड जिल्ह्यातील मृत्युदर चिंताजनक, हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर 72 तासाच्या आत मृत्यूचं प्रमाण अधिक : राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीडमधील कोरोना मृत्युदराविषयी काळजी व्यक्त केलीय.

बीड जिल्ह्यातील मृत्युदर चिंताजनक, हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर 72 तासाच्या आत मृत्यूचं प्रमाण अधिक : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 6:40 PM

बीड : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीडमधील कोरोना मृत्युदराविषयी काळजी व्यक्त केलीय. “बीड जिल्ह्यातील मृत्युदर देखील चिंताजनक आहे. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर 72 तासाच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती दिसत आहे,” असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी तपासण्या वाढविल्या पाहिजेत. तपासण्या करताना शास्त्रीयदृष्ट्या अधिकृत ठरविण्यात आलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची पद्धत वापरली पाहिजे. यामुळे रुग्णांचे सहवासित, हाय-रिस्क, लो-रीस्क बाधित सापडण्यास मदत होईल. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट बरोबरच मृत्युदर नियंत्रणात आणण्यास उपयोग होईल. यावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, असंही त्यांनी नमूद केलं (Rajesh Tope direct health department of beed of corona death).

राजेश टोपे म्हणाले, “आजार अंगावर न काढता तपासणी व रुग्णालयात अडमिट होणेसाठी जिल्हा परिषद सर्कल स्तरावर नियोजन करून व्यापक जनजागृती करावी. कोरोना रुग्णांचे बील अदायगीच्या व नियंत्रणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक खाजगी कोविड रुग्णालयात शासनाच्यावतीने ऑडिटरची नेमणूक केली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल यादृष्टीने हायकोर्टात देखील शासनाने सादर केले आहे.”

काळ्या बुरशीच्या औषधांसाठी साडेसहा हजार कोटी रुपये तरतूद

“काळ्या बुरशीच्या आजारासाठी राज्यशासनाने औषधे आणि इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून उपलब्ध केली आहेत त्यामुळे कोणत्याही रुग्णास जास्त रक्कम देऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही. तसेच यासाठी तातडीची साडेसहा हजार कोटी रुपये तरतूद केली. आवश्यक औषधे केंद्र सरकार करून खरेदी करण्याची राज्याची तयारी आहे,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

बीड जिल्ह्यात प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे एकूण 2 लाख 18 हजार 558 तपासणी

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी प्रशासनाने कोरोना तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या पूर्वतयारीबाबत सांगितले. बालकांना उपचाराच्यादृष्टीने बालरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांचे सेवा तालुकास्तरावर देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिटसाठी आणि आणि लसीकरण वेगात व्हावे देखील कार्यवाही केली जात असल्याचे विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर आढावा सादर केला. बीड जिल्ह्यात प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे एकूण 2 लाख 18 हजार 558 तपासणी केली जात आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16.43 टक्के असून बीड जिल्ह्याचा 15.29 टक्के आहे. तर मृत्यूदर राज्याचा 19.40 टक्के व बीड जिल्ह्याचा 26.50 टक्के आहे असे सांगितले.

जिल्ह्यातील लसीकरण शासनाच्या सुचनांनुसार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यासह सर्वांसाठी सुरू आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यास लसी उपलब्ध होतील असे नियोजन केले असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी कोरोना काळात भरती करण्यात आलेल्या तात्पुरत्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतचा आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत प्रश्न मांडला. आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत्युदर वाढण्याची कारणे तपासली जावीत आणि त्यावर उपाय योजना केल्या जाव्यात असे मत व्यक्त केले. आमदार आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सीजन बेड असलेल्या रुग्णांची व्यवस्था होणे गरजेचे आहे अशी मागणी मांडली. आमदार सुरेश धस यांनी जिल्ह्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त करताना लसींचा साठा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मांडली. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण,आमदार संजय दौंड, आमदार वसंत काळे यांनीदेखील आपले मनोगत मांडले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज : धनंजय मुंडे

काळी बुरशी (म्यूकर मायक्रोसिस) या आजारावरील उपचारांसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 88 लाख रुपये तरतूद केली आहे. यातून काळ्या बुरशीवरील शस्त्रक्रियासाठी लागणारे मायक्रो-डी-ब्राईडर यंत्रणा खरेदी करण्यात येत आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. उपचारावरील सायनस एंडोस्कोपीमध्ये या यंत्रणेची विशेष गरज असून याची खरेदी परदेशातील उत्पादकताद्वारे करून ते आयात करण्यासाठी परवानगी देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयीन अधिकार्‍यांना दूरध्वनी वरून थेट सूचना केल्या.

हेही वाचा :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सर्व तयारी करा, राज्य सरकार पाठीशी – अजित पवार

Video : अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, तरुण पोलिसांच्या ताब्यात

आशा वर्कर्सच्या मागण्या सरकार मान्य करेल, आंदोलनाचा प्रश्नच उद्भवत नाही: राजेश टोपे

व्हिडीओ पाहा :

Rajesh Tope direct health department of beed of corona death

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.