तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी महाराष्ट्राला का नाही?, राजू शेट्टींचा केंद्राला सवाल

अलमट्टीची उंची वाढवल्यामुळं येणाऱ्या अडचणीची दखल केंद्रीय जलआयोग घेणार आहे का ?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी देण्यात आला, मग महाराष्ट्राला का देण्यात आला नाही, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला आहे.

तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी महाराष्ट्राला का नाही?, राजू शेट्टींचा केंद्राला सवाल
राजू शेट्टी


कोल्हापूर : प्रयाग चिखली इथं दत्त महाराजांना ताकद दे अस साकडं घातलं आणि चालत इथे आलो. माणसाने निसर्गाचे लचके तोडले आता निर्सग त्याच काम करत आहे. पूर्वी एक दोन दिवसात पूर येऊन जायचा आता 15 दिवस पूर जात नाहीत याला भराव टाकलेले पूल कारणीभूत आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांचे शेट्टीना बैठकीचे निमंत्रण दिलं आहे. उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी अलमट्टी धरणाची पाणी पातळी आणखी 5 मीटरने उंची वाढविण्याचा निर्णय घेतलाय, अस जर झाल तर कायमचे बॅक वॉटरची अडचण येईल. अलमट्टीची उंची वाढवल्यामुळं येणाऱ्या अडचणीची दखल केंद्रीय जलआयोग घेणार आहे का ?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी देण्यात आला, मग महाराष्ट्राला का देण्यात आला नाही, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला आहे.

तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी महाराष्ट्राला का नाही?

केंद्रीय आपत्ती निवारण निधी कोणाच्या बापाचा नाही .तो मोदींनी निर्माण केलेला नाही. तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी दिला मग महाराष्ट्राला का नाही. केंद्राच पथक आजून का आलं नाही? केंद्राच्या सापत्न वागणुकीमुळे सर्वांची होरपळ होतेय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

मंत्र्यांची दालन कशी सजली?

राजू शेट्टी यांनी राज्याकडे पैसे नाहीत म्हणतात मग मंत्र्यांची दालन कशी सजली आहेत जाऊन पहा असा टोला लगावला. मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत मग पुरग्रस्तांना द्यायला पैसे कसे नाहीत, असाही सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे. काल पर्यंत साधा तलाठी भेटायला आला नाही. मी मेलोय की जगलोय ते ही पाहिलं नाही, पण आज आंदोलनाचा अंदाज आल्यावर धावपळ सुरू झाली आहे. पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. महाराष्ट्रातील अनेक नेते राज्याच्या अस्मितेच्या गप्पा मारत असतात मग आता काय झालं

मुख्यमंत्र्यानी केंद्राकडून होणाऱ्या अन्याय वर आवाज उठवावा आम्ही तुमच्या सोबत येऊ, असं राजू शेट्टी म्हणाले. केंद्रान आपत्ती निवारण निधी मधून राज्याला भरघोस निधी द्यावा, असा ठराव राजू शेट्टी यांनी सभेत मांडला. हा ठराव बहुमंताने मंजूर करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकार च चांगलं पटत, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठीच राणे शिवसेना वाद काढण्यात आला. आमचं आंदोलन सुरू झाल्यावरच मुख्यमंत्री ना बारा आमदार बाबत राज्यपालांना भेटायला वेळ मिळाला. आम्ही आणलेल्या महाविकास आघाडीनेच एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा प्रस्ताव आणला. माझ्याकडे याचा पुरावा आहे .आपली ताकत मोठी आहे.

कालपर्यंत तलाठ्यानं पण दखल घेतली नाही

आपण नृसिहवाडीला येणार म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांच चर्चेसाठी निमंत्रण आलं आहे. काल पर्यंत तलाठ्याने दखल घेतली नाही आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली आहे. निर्णय घ्यायचा म्हटल्यावर फक्त मुख्यमंत्री नकोत संबध्त खात्याचे सचिव सुद्धा हवेत. लगेच प्रश्न सुटला आशा भ्रमात राहू नका, असं राजू शेट्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना म्हणाले आहेत. उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर रस्त्यावर यावं लागेल,मंत्र्यांना अडवाव लागेल. तुमची तयारी आहे का? असा साल राजू शेट्टू यांनी उपस्थितांना केला. आम्ही त्या त्या गावातच जलसमाधीचा निर्णय घेतला तर तेवढी तुमची यंत्रणा आहे, असा सवाल राजू शेट्टी यांनी प्रशासनाला केला, असा निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

सत्तेत असल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा! कोरोना संकटात जबाबदारीने वागण्याची गरज, मुख्यमंत्र्याचे जनतेला आवाहन

Raju Shetti asked question why Maharashtra Government not get relief fund of tauktae cyclone

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI