AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनियंत्रित कार शेताशेजारील रसवंतीगृहात शिरली; त्यानंतर कारच्या समोरच्या चाकाखाली…

संतोष शिंदे यांनी उसाची लागवड केली. शेतातच रसवंती लावली. दुपारची वेळ असल्याने ते घरी गेले होते. थोड्या वेळासाठी मुलाला रसवंतीगृहात बसवले होते.

अनियंत्रित कार शेताशेजारील रसवंतीगृहात शिरली; त्यानंतर कारच्या समोरच्या चाकाखाली...
| Edited By: | Updated on: Mar 27, 2023 | 3:10 PM
Share

सांगली : जिल्ह्यात उसाची लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांचा ऊस हा रस्त्याला लागून आहे. त्यामुळे उसापासून रस विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. शेतातील ताजा ऊस तोडायचा. त्यापासून रस तयार करून विक्री करायचा, असा हा नगदी पैसे मिळवून देणारा व्यवसाय. संतोष शिंदे यांनी उसाची लागवड केली. शेतातच रसवंती लावली. दुपारची वेळ असल्याने ते घरी गेले होते. थोड्या वेळासाठी मुलाला रसवंतीगृहात बसवले होते. तेवढ्यात अनियंत्रित वेगवान कार आली आणि अनर्थ घडला.

या वेगवान कारने रसवंतीगृहाचे शेड तोडले. थेट आतमध्ये ही कार शिरली. शेडखाली ११ वर्षांचा मुलगा बसला होता. तो चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गर्दी जमा झाली. संतोष शिंदे यांना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. नेहमी मदतीसाठी येणारं बाळ गेलं होतं.

कारखाली आल्याने विद्यार्थी ठार

पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे भरधाव वेगाने जाणारी मोटारकार जात होती. ती कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ संतोष शिंदे वय 11 असे मृताचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारीच्या दरम्यान घडला. भिलवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

कार रसवंतीगृहाच्या शेडमध्ये शिरली

तासगाव भिलवडी रस्त्यालगत खंडोबाचीवाडी येथे एका पेट्रोल पंपाच्या जवळ शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. रविवारी दुपारी या ठिकाणी त्यांचा मुलगा समर्थ बसला होता. यावेळी अचानक भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी मोटार (क्र. एमएचसीएक्स 4081) रसवंतीगृहाच्या खंडोबाचीवाडी गावातील शेडमध्ये घुसली.

मोटारीचा वेग इतका भरधाव होता की, रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या रसवंतीगृहात घुसली. रसवंतीगृहाची पत्र्याची शेड उचकटून शेतात कोसळली. मोटारीच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने समर्थ शिंदेचा जागीच मृत्यू झाला.

समर्थ हा शाळेत जाणारा मुलगा. दुपारी वडिलांना मदत करायला तो गेला होता. त्यावेळी अचानक दुर्घटना घडली. त्यामुळे समर्थचा शेवट झाला. चुणचुणित बाळ गेल्याने घरचे तसेच नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.