Video : सांगलीत नशेखोर मुलांना महिलांकडून चोप; सोशल मीडियात धम्माल व्हिडीओ व्हायरल

मागील काही दिवसांपासून नशेखोर मुले पेट्रोल पंपावर येऊन धमकी देत होती. वीस-तीस रुपयाचं पेट्रोल टाका म्हणून ते धमकी देत होते. काही मुलांनी चेतना पेट्रोल पंपावर गोंधळ घातला आणि तेथील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र हे सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर तेथील महिला कर्मचाऱ्यांनी त्या नशेखोर मुलांची चांगलीच धुलाई केली.

Video : सांगलीत नशेखोर मुलांना महिलांकडून चोप; सोशल मीडियात धम्माल व्हिडीओ व्हायरल
प्रेमाच्या त्रिकोणात विटेने ठेचून मारलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 2:08 AM

सांगली : महिलांच्या सुरक्षेला धक्का देणाऱ्या घटना सर्वत्र घडत आहेत. अनेकदा तरुण व्यसन आणि नशेच्या आहारी गेल्याने वाईट मार्गाला लागलेला असतात. त्यातूनच ते निष्कारण महिलांना त्रास देतात, त्यांची छेड काढतात. सांगली जिल्ह्यात मात्र अशा नशेखोरांची खोड महिलांनी त्यांना बेदम चोप (Beating) देऊन मोडली. सांगलीच्या चेतना पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. ह्यात महिलांनी मोठी हिम्मत दाखवून नशेखोर मुलांना चोप देत त्यांना अद्दल घडवली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात भलताच व्हायरल (Viral) झाला आहे. लोक ह्या व्हिडिओचा आनंद लुटून महिलांच्या धाडसी कृत्याचे कौतुक करू लागले आहेत. (Sangli drugged youths beaten by women video goes viral on social media)

पेट्रोल पंपावरील महिलांना धमकावण्याचे प्रकार

मागील काही दिवसांत पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. त्यामुळे वाहन चालकांची पंचाईत होत आहे. अशात पेट्रोल पंपावर खटके उडण्याचे प्रकार सुरु असतात. त्यातच सांगलीच्या चेतना पेट्रोल पंपावर महिला कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे सत्र सुरु होते. अशा प्रकारची धमकी देणारी मुले नशा करून येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी नशेखोर मुलांची नशा उतरवण्याचा निर्धार केला होता.

अनेक दिवसांपासून पेट्रोल पंपावर सुरु होता उच्छाद

मागील काही दिवसांपासून नशेखोर मुले पेट्रोल पंपावर येऊन धमकी देत होती. वीस-तीस रुपयाचं पेट्रोल टाका म्हणून ते धमकी देत होते. काही मुलांनी चेतना पेट्रोल पंपावर गोंधळ घातला आणि तेथील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र हे सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर तेथील महिला कर्मचाऱ्यांनी त्या नशेखोर मुलांची चांगलीच धुलाई केली. नशा करून ही मुले राजरोज उच्छाद मांडत होती. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. याचा धम्माल व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. सांगली जिल्ह्यात नशा करणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी अशा नशाबाजांना ताळ्यावर आणण्यासाठी विशेष मोहीम उभारावी, अशी जोरदार मागणीही या निमित्ताने होऊ लागली आहे. (Sangli drugged youths beaten by women video goes viral on social media)

इतर बातम्या

Kalyan Boy Drown : सुट्टीत पोहण्याचा आनंद जीवावर बेतला; कल्याणमध्ये 16 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

Gutkha Siezed : धुळ्यात दोन कोटी रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.