शंभू महादेव साखर कारखाना 46 कोटी रुपये तारण साखर घोटाळा प्रकरण, बँक अधिकाऱ्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी 

हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी येथील वैजनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या 46 कोटी रुपयाच्या साखर घोटाळा प्रकरणी वैजनाथ बँकेचे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शंभू महादेव साखर कारखाना 46 कोटी रुपये तारण साखर घोटाळा प्रकरण, बँक अधिकाऱ्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी 
वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, परळी

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी येथील वैजनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या 46 कोटी रुपयाच्या साखर घोटाळा प्रकरणी वैजनाथ बँकेचे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस स्टेशनध्ये 12 मार्च 2021 रोजी शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह 40 आरोपीविरुद्ध भादंवि 420, 406, 401 आदी कलमानुसार गुन्हा दाखल आला होता.

46 कोटी 23 लाख रुपयांचं कर्ज घेतलं

कळंब तालुक्यातील हावरगाव येथील शंभु महादेव शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याची स्थापना 2000 मध्ये झाली असून कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट आहेत. शंभु महादेव शुगर अन्ड अलाईट इंडस्ट्रीज लि. हावरगाव या कारखान्यासाठी चेअरमन दिलीपराव आपेट व कारखान्यांचे संचालक मंडळांनी या कारखान्यासाठी 2002 पासून 2017 या कालावधीमध्ये वेळोवेळी तोडणी, वाहतूक, यंत्रणा उभारणीसाठी, शेतकऱ्यांना ऊसबील देण्यासाठी साखर कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर साखर तारण व कारखाना गहाणखत करून 46 कोटी 23 लाख रूपये कर्ज घेतले. हे कर्ज वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक, परळी यासह अन्य बँकांकडून ही रक्कम जमा करून वैयक्तीक जिम्मेदारीवर हावरगाव येथील शंभु महादेव कारखान्याला दिले होते. कर्ज हे कारखान्यात उत्पादीत झालेल्या साखरेवर व कारखान्याच्या व इतर स्थावर मालमत्तेवर गहाणखताद्वारे देण्यात आले होते.

साखर साठ्याची दिशाभूल

कर्ज देताना दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन व शंभु महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांनी साखर कारखान्यामध्ये 2017 मध्ये शंभु महादेव साखर कारखाना हावरगाव येथील साखरेच्या गोडाउनमध्ये 154177 एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणुन साखर साठा ठेवल्याचे दाखवले.

तारण असलेल्या साखर साठय़ाच्या गोडाऊनला दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेने स्वत:चे मालकीचे कुलप लावून सील केले होते. तसेच या साखर साठ्यावर नियंत्रक म्हणून स्थानिक बँक अधिकारी म्हणुन नियुक्त केले होते. तारण साखर साठय़ाच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. तारण साखर साठा खुल्या बाजारात विक्री करण्याचे बँक व साखर कारखाना यांच्यातील करारामध्ये ठरले होते.

शंभु महादेव कारखान्यास ज्यावेळेस साखर टेंडरद्वारे जाहिर निविदा काढून विक्री करावयाची आहे. त्या-त्या वेळी कारखाना जेवढा साखर साठा विक्री करावयाचा आहे. तेवढया साखरेच्या रक्कमेचा भरणा वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँक लि. मुख्य कार्यालय परळी येथे किंवा दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. शाखा केज येथे या बँकेस करत होते. त्यानंतर दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखी आदेशाने भरणा केल्यानंतर भरणा केलेल्या रक्कमेइतका साखर साठा शंभु महादेव साखर कारखाना यांच्या मार्फतीने खरेदीदारास दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळीचा शंभु महादेव साखर कारखाना हावरगांव येथे नियुक्त केलेला स्थानिक बँक अधिकारी मार्फतीने देण्यात येत होता.

बेकायदेशीर कर्जपुरवठा

साखरसाठा खरेदीदारास देताना तारण ठेवलेल्या साखरेच्या स्टॉक रजिस्टरवरती नोंदी करून देण्यात येत होते. शंभु महादेव कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट व दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांचे वैयक्तीक आर्थीक स्वरूपाचे व्यवहार होते. चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांनी वेळोवेळी स्वत:चे आधिकारात 2013 पासुन ते 2017 या कालावधीमध्ये नियमानुसार कर्ज वाटप न करता इतर सहभागी 18 बँकाना कोणतीही पूर्वकल्पना न देता, तसेच 2017 मध्ये साखर आयुक्त यांचा कारखान्यास गाळप परवाना नसतानाही बेकायदेशीर कर्जपुरवठा केला.

चेअरमन अशोक पन्नालाल जैन यांनी कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेकडे तारण असलेला साखर साठा परस्पर विक्री केला. गोडावूनमध्ये असलेला तारण साखर साठा 154177 पोते परस्पर विक्री करून 27 कोटी 23 लाख रूपयाचा अपहार केला. हा अपहार जुलै 2017 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.

अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा

या प्रकरणी शंभु महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट (रा. पद्मावती गल्ली, परळी) , वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन (रा. स्वाती नगर, हालगे गल्ली, परळी ), वै.अ.को-आप बँक शाखा केज शाखा व्यवस्थापक प्रसाद त्रिंबकराव कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद मुरलीधर खर्चे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मधुकर चितळे (रा. परळी), तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी महेशचंद्र गणपतराव कवठेकर (ह.मु. संभाजीनगर), मॅनेजर वैद्यनाथ बँक परळी संजय पंढरीनाथ खंदारे व दि. वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ मधील कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

(Shambhu Mahadeo Sugar Factory, Bank officer jailed for 5 days for Rs 46 crore corruption)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI