उदयनराजे म्हणाले सभासदांची जिरवू नका, आता शिवेंद्रराजेंचा थेट हल्ला, म्हणाले…

उदयनराजे यांच्या या प्रतक्रियेला आमदार शिवेंद्रराजे यांनी सोडतोड उत्तर दिलंय. मागील पाच वर्षात नेमकं आम्ही काय केलं ते उदयनराजेंनी सांगावं. कोणाची कोण जिरवायला जात नसतं. त्यांची कोण जिरवणार हे त्यांच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं असावं, असं खोचक प्रत्युत्तर शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना दिलंय.

उदयनराजे म्हणाले सभासदांची जिरवू नका, आता शिवेंद्रराजेंचा थेट हल्ला, म्हणाले...
SHIVENDRA RAJE UDANYAN RAJE
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 30, 2021 | 5:02 PM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेवरून “माझी जिरवा पण सभासदांची जिरवू नका” अशी हात जोडून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. उदयनराजे यांच्या या प्रतक्रियेला आमदार शिवेंद्रराजे यांनी सोडतोड उत्तर दिलंय. मागील पाच वर्षात नेमकं आम्ही काय केलं ते उदयनराजेंनी सांगावं. कोणाची कोण जिरवायला जात नसतं. त्यांची कोण जिरवणार हे त्यांच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं असावं, असं खोचक प्रत्युत्तर शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना दिलंय.

मग सभासदांची जिरवली कुठे ?

कोणाची कोण जिरवायला जात नसतं. त्यांची कोण जिरवणार हे त्यांच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं असावं. मागील पाच वर्षात आम्ही नेमकं काय केलं ते उदयनराजेंनी सांगावं. सभासदांना कर्जपुरवठा केला नाही किंवा पंधरा ते वीस सोसायट्यांचा जाणीवपूर्वक कर्जपुरवठा बंद केला, असे कुठेच घडलेले नाही. मग सभासदांची जिरवली कुठे ? त्यांनीच आम्हाला उत्तर द्यावे, असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना केला.

उदयनराजे काय म्हणाले होते ?

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आल्याबद्दल माहिती विचारली होती. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलं होतं. उदयनराजे भाोसले यांनी बँकेच्या उत्तरावर  संतप्त प्रतिक्रिया दिलीय. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे ती राहू द्या. त्यांची जिरवू नका, ही विनंती, असं उदयनराजे हात जोडून म्हणाले होते.

मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका

अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आलीय. मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका. मी कुणाचा दुश्मन नाही. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहूद्या. त्यांची जिरवू नका ही विनंती. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं. कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. व्हायचं ते होऊ द्या, असं उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
इतर बातम्या :
औरंगाबादः 41 वर्षांचा वडिलांचा लढा मुलाने जिंकला, भरपाई 3 वरून 23 लाख रुपयांवर, जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आली होती जप्ती
Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

 

(shivendra raje bhosale criticise udayanraje bhosale on satara district bank)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें