AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, युवा सनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडला साप, अनोख्या आंदोलनाची चर्चा

नांदगाव खंडेश्वर येथे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी चक्क महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्याच्या टेबलवर साप सोडला.

Video | विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, युवा सनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडला साप, अनोख्या आंदोलनाची चर्चा
AMRAVATI YUVA SENA PROTEST
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 8:43 PM
Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील महावितरण कार्यालयात युवा सेनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. आज (19 जुलै) युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी चक्क महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्याच्या टेबलवर साप सोडला. लोडशीडिंगची कोणतही पूर्वसूचना न देता नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. (snake protest organised by Amravati Nandgaon Khandeshwar Yuva Sena at MSEDCL office due to irregular power cut)

सूचना न देता वीजपुरवठा खंडित

मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून अवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या तालुक्यात कोठेही लोडशेडिंगची सूचना महावितरण कडून देण्यात आलेली नाही. तरीदेखील मागील एका महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. याच कारणामुळे येथील युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

टेबलवर साप सोडत, विचारला जाब

युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील महावितरण कार्यालय गाठले. तसेच यावेळी त्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यामागचे संबंधित अधिकाऱ्यांना कारण विचारले. तसेच अधिकाऱ्याच्या टेबलवर थेट साप सोडून अनोखं आंदोलन केलं.

आंदोलनाची सर्वत्र चर्चा

दरम्यान, टेबलवर साप दिसताच महावितरणच्या अधिकाऱ्यांचा थरकाप उडाला होता. सध्या या आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Mumbai Rains Live Updates | शहरात मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू

Monsoon Alert : पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पावसाचा जोर वाढण्याचा IMDचा अंदाज

त्याने जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, शेवटी शरीरातील त्राण गेला अन् प्राण सोडला, तरुणाच्या मृत्यूमुळे नगर हळहळलं

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.