Video : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. (South And north Ratnagiri heavy Rain)

Video : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मनोज लेले

| Edited By: Akshay Adhav

Jun 17, 2021 | 8:41 AM

रत्नागिरी : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. (South And north Ratnagiri heavy Rain Flood conditions in Chiplun city)

रात्री पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण मधल्या वशिष्ठी नदीला पूर आलाय. चिपळूण बाजार पेठेधल्या सखल भागात पाणी साचलं होतं. सकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाणी ओसरायला हळूहळू सुरुवात झाली.

रत्नागिरीत मुसळधार, अर्जुना नदीला पूर

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे अर्जुना नदीला पूर आलाय. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात सध्या पाणी आलंय. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेव्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाचा जोर ओसरला पाहायला मिळतोय.

घाटात दरड कोसळून ट्रॅफिक जाम, वाहतूक पुन्हा सुरळित

रत्नगिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी जवळच्या निवळी घाटात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. जोरदार पावसाने घाटात दरड कोसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळली होती. सकाळी सात नंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

जोरदार पावसाने नदी-नाले-ओढे दुधडी भरुन वाहू लागले

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. जवळपास 5 ते 6 तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. जोरदार पावसाने नदी-नाले-ओढे दुधडी भरुन वाहू लागलेत.

(South And north Ratnagiri heavy Rain Flood conditions in Chiplun city)

हे ही वाचा :

Maharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें