Maharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी| Maharashtra News LIVE Update

Maharashtra News LIVE Update | राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती
Breaking News

| Edited By: prajwal dhage

Jun 18, 2021 | 12:17 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी| Maharashtra News LIVE Update

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 17 Jun 2021 09:13 PM (IST)

  राज्य सरकारने मोर्चाची ताबडतोब दखल घेतली, सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या : संभाजी छत्रपती

  सकल मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांसोबत आताच बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अशोक चव्हाण आदी मंत्री उपस्थित होते. बऱ्यापैकी सविस्तर चर्चा झाली. सकल मराठा समाजाने 6 मागण्या पुढे ठेवल्या होत्या. 17-18 मागण्या आहेत. पण विषय मार्गी लागण्याच्या दृष्टीतून 6 मागण्या मांडल्या.

  कोल्हापुरातून काल शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरुन मूक आंदोलनाला सुरुवात केली. त्याची राज्य सरकारनं ताबडतोब दखल घेतली. म्हणून त्यांनी आजच बैठक बोलावली होती.

  प्रमुख मागण्या आम्ही त्यांच्यापुढे मांडल्या.

  मराठा आरक्षण – सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द केल्यानंतर आपण पुढे कसं जायला हवं. त्या पार्श्वभूमीवर रिव्ह्यू पिटीशन गुरुवारी राज्य सरकार दाखल करणार आहे.

  सारथी – सारथी हे सगळ्याचं हृदयस्थान. सारथीच्या माध्यमातूनच आपण मराठा समाजाला पायावर उभा करु शकतो. अधिकारी वर्गाकडून योग्य रित्या काम होत नसल्याचं त्यांनी मान्य केलं. येत्या शनिवारी त्याबाबत पुण्यात बैठक होणार आहे. माझी अपेक्षा आहे की शनिवारी सारथीच्या चेअरमननी पैशाची मागणी करावी. सरकारनं लागेल तेवढा पैसा देण्याची तयारी दर्शवली आहे. समाजासाठी जे लोक योगदान देत आहेत असे लोक घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.

  वसतीगृह – 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्हे सरकारने निवडले आहेत. सरकारची इमारत असलेल्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जबाबदारी सरकार घेणार आहे.

  आण्णासाहेब पाटील महामंडळ – कर्जाची मर्यादा १० लाखावरून २५ लाखापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. त्यालाही सरकारनं मान्यता दिलीय.

  नियुक्त्या – एमपीएससीच्या नियुक्तांबाबत विशेष बाब म्हणून मुलांना नियुक्त्या द्या. सुपर न्युमररी अर्थात अधिसंख्येची जागा देण्याबाबतही त्यांनी अटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांना सांगितलं. त्यांनी 14 दिवसांची वेळ मागितली आहे. कायदेशीर बाबी तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल. या जागांचा वाढत्या खर्चाचा भार सोसू असा शब्द सरकारनं दिलाय.

  कोपर्डी बलात्कार प्रकरण – २०१७ ला शिक्षा झाल्यानंतर फाशीशी शिक्षा झालेल्या दोषीने अपील केलंय. सरकारने याबाबत अपील करण्याची मागणी आहे. १ जुलैपासून हिअरिंगला सुरुवात होणार. तेव्हा सरकारकडून स्पेशल बेंचची मागणी केली जाणार आहे.

  मराठा आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने आश्वासन दिलंय.

  एक समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांसोबत दैनंदिन बैठक होणार.

  मूक आंदोलन सुरुच राहणार. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार.

 • 17 Jun 2021 07:46 PM (IST)

  पत्नीनेच केली पतीची हत्या, अनैतिक संबंधातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती

  ठाणे : कल्याण क्राईम ब्रांचची मोठी कामगिरी

  हत्येचा गूढ उकलेले

  17 दिवसापासून तरुण प्रवीण पाटील होता बेपत्ता

  रिक्षा चालक पत्नीने केली दोन प्रेमींसोबत पतीची हत्या

  पत्नीसह दोन प्रेमी क्राईम ब्रांचच्या ताब्यात

  अनैतिक संबंधातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती

 • 17 Jun 2021 06:58 PM (IST)

  नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच

  नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच

  सकाळपासून कधी रिमझिम कधी जोरदार कोसळधारा

  पनवेल शहरातील स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाला धबधब्याचे स्वरूप

  पावसाचे पाणी पाईपमधून न जाता धबधब्यासारखे कोसळत आहे

 • 17 Jun 2021 06:57 PM (IST)

  पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, तळजाई परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांची तारांबळ 

  पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात

  सकाळपासून पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

  तळजाई परिसरात फिरायला आलेल्या पुणेकरांची पावसामुळे तारांबळ

  तळजाई पायऱ्यावर पावसामुळं धबधब्याचं स्वरूप

  धबधबा वाहिल्यासारखं वाहतंय पाणी

  धनकवडी, भारती विद्यापीठ, तळजाई परिसरात धुवावार पाऊस

  पावसाचा आनंद लुटायला पुणेकर बाहेर

 • 17 Jun 2021 06:14 PM (IST)

  मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा, काकोडा परिसरात पाऊस सुरु

  जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा, काकोडा परिसरात पाऊस सुरु

  सध्या शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस असल्यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

  आता पेरणीला वेग येणार

 • 17 Jun 2021 05:57 PM (IST)

  दहावीचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा

  दहावीचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा

  मंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरद्वारे माहिती

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार

  A big thank you to @CMOMaharashtra & State Disaster Management Authority, Maharashtra for granting my request to allow teachers & non-teaching staff involved in assessment work for Std Xth to travel on local trains for official purposes.#teacher #sscresults #localtrain

  — Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 17, 2021

 • 17 Jun 2021 05:53 PM (IST)

  साताऱ्यात शाहूनगर येथे अर्धवट बांधकाम असणाऱ्या घरात घुसला बिबट्या 

  सातारा: शाहूनगर येथे अर्धवट बांधकाम असणाऱ्या घरात घुसला बिबट्या

  अचानक बिबट्या आल्याने परिसरात भीतीचे वातावरण

  बिबट्याने त्या घरातून शेतात पुन्हा धूम ठोकल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

  वनविभागाच्या कर्मचारयांकडून घटनास्थळाची पाहणी

 • 17 Jun 2021 05:20 PM (IST)

  नागपुरात वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात, शेतीसाठी महत्वाचा ठरणार पाऊस

  नागपूर - नागपुरात वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात

  वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकड्यापासून सुटका

  शेतीसाठी महत्वाचा ठरणार पाऊस

 • 17 Jun 2021 04:53 PM (IST)

  वसई विरार, नालासोपाऱ्यात दुपारनंतर मुसळधार पावसाची हजेरी

  वसई : वसई विरार नालासोपाऱ्यात दुपार नंतर मुसळधार पावसाची हजेरी

  शहरातील सखल भागातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले असून रस्त्यांवर गुडगाभर ते कंबरेच्यावर पाणी साचले आहे.

  सर्व परिसर जलमय झाला आहे

  नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, पूर्वेकडील फुलपाडा, साईनाथ नगर, चंदनसार, या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. दुपारपासून पावसाचा जोर  कायम असून मुसळधार पाऊस सुरूच आहे.

 • 17 Jun 2021 04:51 PM (IST)

  रेवदंडा येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले, 16 खलाशांना बाहेर काढण्यात यश 

  रायगड : रेवदंडा येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले

  जे एस डब्ल्यू कंपनीचे मालवाहू बार्ज

  ओहोटीच्या वेळी गाळात रुतले बार्ज

  आज सकाळची घटना, बार्जवर 16 खलाशी

  सर्व खलाशांना बाहेर काढण्यात यश

  तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरची मदत

 • 17 Jun 2021 04:17 PM (IST)

  औरंगाबादेत लसीकरण सक्तीचे करण्याचा मनपाचा विचार 

  औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्याने लसीकरण सक्तीचे करण्याचा मनपाचा विचार

  औरंगाबाद जिल्ह्यात 35 हजार लसी पडून, मात्र नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवली पाठ

  औरंगाबाद शहरात सर्वांना लसीकरण सक्तीचे करण्याचा मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांचा विचार

  21 जून पर्यंत 18 वर्षा वरील नागरिकांना लस देण्याचे करण्यात येणार नियोजन

  लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्याने मनपापुढे मोठे आव्हान

 • 17 Jun 2021 04:04 PM (IST)

  कोल्हापुरात पावसाची मुसळधार सुरूच, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

  कोल्हापुरात पावसाची मुसळधार सुरूच

  पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

  मुसळधार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर

  राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी पोहचली 30 फुटांवर

  जिल्ह्यातील 48  बंधारे पाण्याखाली

  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 • 17 Jun 2021 03:53 PM (IST)

  हर्षवर्धन जाधव जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

  औरंगाबा : हर्षवर्धन जाधव यांची आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल

  जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

  व्हिडीओ क्लिपमधून हर्षवर्धन जाधव यांनी दिले संकेत

  हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जालना लोकसभा मतदारसंघात झळकले बॅनर

  वाढदिवसाचे बॅनर झळकल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी मानले आभार

  आभार मानताना जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत

 • 17 Jun 2021 03:51 PM (IST)

  कोरोनाबाबत सरकाचा फेल्यूअरची सर्वत्र चर्चा- प्रकाश आंबेडकर

  मुंबई : कोरोनाबाबत सरकाचा फेल्युअरची सर्वत्र चर्चा सुरू आहे- प्रकाश आंबेडकर

  भाजपवर मोदींवर टिका होत आहे, त्यांची प्रतिमा डागाळत आहे- प्रकाश आंबेडकर

  - युपी निवडणुका महत्वाच्या आहेत.

  धार्मिक कलह व्हावा, यासाठी मौलवीची दाढी कापली, असे प्रकार होऊ शकतात

  - युपीत जाणिपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न निर्माण होतोय.

  पुढे पुतळ्यांची विटंबना होऊ शकते अशी भीती आहे.

  - देवांबाबत अपशब्द काढल्यावर अघटीत होऊ शकतं

  शांतता राहावी यासाठी कायदा करावा

 • 17 Jun 2021 01:18 PM (IST)

  धावत्या मेल एक्स्प्रेस मधून महिलेची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले

  कल्याण :

  धावत्या मेल एक्स्प्रेस मधून महिलेची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले

  बुधवारी जोधपूर एक्स्प्रेस मध्ये घडला होता प्रकार

  चोरट्याचे नाव इमरान सिद्दीकी

  चोरट्याकडून चोरलेले 5 मोबाईल आणि दागिने हस्तगत

  कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांची मोठी कारवाई

  चोरट्याला पकडण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

 • 17 Jun 2021 12:49 PM (IST)

  ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेचे आंदोलन

  वर्धा

  - ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेचे आंदोलन

  - स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी आक्रोश आंदोलन

  - वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन

  - ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आलीय

  - आंदोलनात केंद्रासरकार विरोधात घोषणाबाजी

 • 17 Jun 2021 12:48 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

 • 17 Jun 2021 12:48 PM (IST)

  डहाणूतील फटाका फॅक्टरीला वेल्डिंग करताना ठिणगी उडून आग, 10 जण भाजले

  पालघर ब्रेकिंग

  डहाणू तालुक्यात डेहणे-पळे येथील फटाका फॅक्टरीला वेल्डिंग करताना ठिणगी उडून आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे

  या घटनेमध्ये दहा जण भाजले असून एक जण गंभीररीत्या भाजला आहे जखमींना डहाणू आशागड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

  घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत

  घटनास्थळी अग्निशमन दला सह तहसीलदार व संबंधित खात्यांचे अधिकारी घटनेची चौकशी व अहवाल घेण्यासाठी दाखल झाले आहेत

 • 17 Jun 2021 12:25 PM (IST)

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील बुटीबोरी उड्डाणपुलाचं लोकार्पण

  नागपूर -

  - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुटीबोरी उड्डाणपुलाचं लोकार्पण

  - आजपासून उड्डाणपूल लोकांसाठी खुला

  - ६९ कोटी रुपयांत बनला सहा लेनचा उड्डाणपूल

  - बुटीबोरी महामार्गावर ट्राफीक जामपासून मिळणार दिलासा

 • 17 Jun 2021 12:24 PM (IST)

  ओबीसी कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात

  - ओबीसी कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात

  - द्वारका परिसरात जोरदार आंदोलन

  - वाहतूक ही ठप्प

  - द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात

 • 17 Jun 2021 12:00 PM (IST)

  मालेगावात महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना रास्ता रोको करण्यास पोलिसांनी रोखले

  मालेगाव -

  महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना रास्ता रोको करण्यास पोलिसांनी रोखले

  मालेगाव येथे OBC आरक्षण बचाव आक्रोश मोर्च्या काढून रास्ता रोको आंदोलन करण्यास जमलेल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

  मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार होते रास्ता रोको आंदोलन

 • 17 Jun 2021 11:18 AM (IST)

  डहाणू तालुक्यातील डेहणे येथे फटाका कंपनीच्या बाजूला मोठा स्फोट, 5 ते 10 किलोमीटरपर्यंतच्या घरांना धक्के जाणवले

  पालघर -

  डहाणू तालुक्यातील डेहणे येथे फटाका कंपनीच्या बाजूला मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती,

  5 ते 10 किलोमीटर आजूबाजूच्या घरांना मोठे धक्के जाणवले

 • 17 Jun 2021 11:16 AM (IST)

  स्वारगेट ते सासवड दरम्यानच्या नवीन मेट्रो मार्गांचा सुधारित प्रारुप अहवाल सादर

  पुणे -

  - स्वारगेट ते सासवड दरम्यानच्या नवीन मेट्रो मार्गांचा सुधारित प्रारुप अहवाल सादर

  - स्वारगेट- रेसकोर्स- हडपसरमार्गे सासवड रेल्वे स्टेशन दरम्यानच्या नवीन मेट्रो मार्गांचा अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पीएमआरडीए सादर केला आहे,

  - यामुळे हिंजवडी आयटी पार्क ते सासवड आयटी पार्क मेट्रो मार्गाने जोडण्याचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे,

  - भविष्यातील पुरंदर विमानतळाचा विचार करून शिवाजीनगर ते सासवड हा मेट्रो मार्ग प्रस्तावित,

  - स्वारगेट ते रेसकोर्स या तीन किलोमीटर लांबीचा, तर हडपसरपासून सासवड रेल्वे स्टेशन असा सुमारे २५ किलोमीटरचा मार्ग नव्याने दर्शविला आहे.

 • 17 Jun 2021 11:15 AM (IST)

  नांदगाव तालुक्यातील बोलठान सह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

  मनमाड :  नांदगाव तालुक्यातील बोलठान सह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

  मुसळधार पावसामुळे बोलठाण नदीला आला पूर

  शेतातून शेतकाम आवरून बैलगाडी वरून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांची बैलगाडी गेली वाहून त्यात दोन्ही बैलांचा झाला मृत्यू

  तर शेती आणि साहित्याचे झाले नुकसान

 • 17 Jun 2021 11:15 AM (IST)

  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होणार

  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होणार

  प्रदीप शर्मा सध्या एनआयए अधिकाऱ्यांच्या ताब्यात

  प्रदीप शर्मा आज पहाटे एनआयए अधिकाऱ्यांच्या ताब्यात

  एनआयए चे अधिकारी प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी घेऊन जात आहेत.

 • 17 Jun 2021 11:14 AM (IST)

  गन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात केंद्र सरकार विरोधात ओबीसी समाजाचा एल्गार

  - छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात केंद्र सरकार विरोधात ओबीसी समाजाचा एल्गार

  - मालेगाव-नगर राज्य मार्गावरील येवल्यातील विंचूर चौफुलीवर रस्तारोको आंदोलन सुरू

  - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनेच्या वतीने ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी

 • 17 Jun 2021 10:04 AM (IST)

  मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं, मी स्वागत करतो - संभाजीराजे छत्रपती

  कोल्हापूर

  संभाजीराजे छत्रपती -

  या पूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत

  मूक आंदोलन झाल्यानंतर चर्चेला बोलावलं, मी स्वागत करतो

  चर्चा सकारात्मक होईल अपेक्षा आहे, मात्र झाली नाही काय होईल ते मला सांगायची गरज नाही

  आज ची भेट उद्या व्हावी अशी समन्वयकाची भूमिका होती

  पण मुख्यमंत्र्यांचा आज बैठक घेण्यासाठी आग्रह होता

  भेटी आदी समन्वयकांची कोणतीही बैठक होणार नाही

  आरक्षणासाठी लढा कायम राहणारच आहे..तो लढा चालू असताना राज्य सरकारने आपल्या हातातल्या गोष्टी मार्गी लावाव्या

  केंद्र स्तरावर माझे प्रयत्न या आदी पासून सुरू आहे..अनेकांनी पत्र ही दिलं आहे

  समाजाच हित होणार असेल तर घटनेत दुरूस्ती होऊ शकते

 • 17 Jun 2021 09:23 AM (IST)

  खोपोली, खालापुर, कर्जत, नागोठणे, रोहा परिसरात जोरदार पाऊस

  रायगड

  खोपोली, खालापुर, कर्जत, नागोठणे, रोहा परिसरात जोरदार पाऊस.

  उरण ला हलक्या सरी, अलिबाग मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस.

  जिल्ह्यातील सर्व नद्या मात्र ईशारा पातळीच्या खाली.

 • 17 Jun 2021 09:10 AM (IST)

  मिरजेतील 265 धोकादायक इमारतींना मनपाने दिल्या नोटीसा

  सांगली -

  मिरजेतील 265 धोकादायक इमारतींना मनपाने दिल्या नोटीसा

  मिरजेत 100 वर्षा पूर्वी च्या काही धोकादायक जुन्या इमारती आहेत

  यामधील 22 इमारती राहनयेस अयोग्य

  32 इमारती खाली करून दुरुस्त कार्येत येतील

  तर 169 इमारती खाली न करता दुरुस्त करणेत येतील

  32 इमारती किरकोळ दुरुस्ती अशा सर्व इमारती मालकांना दिलेत नोटिसा

  मनपा सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे याची माहिती

 • 17 Jun 2021 07:58 AM (IST)

  मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सापडली संकटात, योजनेला सिंचन विभागाने दर्शवला विरोध

  औरंगाबाद -

  मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सापडली संकटात

  मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला सिंचन विभागाने दर्शवला विरोध

  वाटर ग्रीड मुळे जिल्ह्या जिल्ह्यात भांडणे होणार असल्यामुळे विरोध

  सिंचन विभागाच्या प्रस्तावानंतर वाटर ग्रीडवरून राज्य सरकार बॅकफूटवर

  26 हजार कोटी रुपये खर्चून होणार होती वाटर ग्रीड योजना

  मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पुरवण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प

  मराठवाड्यातील सर्व जिल्हे पाईप लाईनने जोडले जाणार होते

  सिंचन विभागाच्या विरोधानंतर योजना बारगळण्याची शक्यता

 • 17 Jun 2021 07:42 AM (IST)

  चिपळूण, गुहागर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

  चिपळूण - चिपळूण, गुहागर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

  पहाटे चिपळूण मधील सखल भागात भरले पाणी मात्र आता पावसाची विश्रांती

  जुना बाजारपूल , नाईक कंपनी मच्छी मार्केट परिसरात भरले पाणी

  चिपळूण शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती

  पावसाचा जोर वाढल्यास चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता

 • 17 Jun 2021 07:41 AM (IST)

  खामगावसह सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात मुसळधार पाऊस

  बुलडाणा -

  खामगावसह सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात मुसळधार पाऊस

  खामगावच्या गणेशपूर जवळील नदीला पूर

  साखरखेर्डा जवळील सवदड सह उमानगव पुलाचे मोठे नुकसान

  परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान

  पेरणीचे दिवस असल्याने तात्काळ पुलाचे काम पूर्ण करा, नागरिकांची मागणी

 • 17 Jun 2021 07:31 AM (IST)

  दारुच्या नशेत शिपायाने विहिरीत टी.सी.एलची पिशवी टाकली, 50 हून अधिक नागरिकांना बाधा

  सातारा : दारूच्या नशेत सरताळे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टाकली शिपायाने संपूर्ण टी.सी.एल ची पिशवी

  50 हुन अधिक नागरिकांना दूषित पाणी पिल्याने झाली बाधा

  वाई,सातारा येथे उपचारासाठी नागरिक दाखल

  एकाची प्रकृती गंभीर तर काही किरकोळ उपचार घेऊन सुखरूप घरी

  जावली तालुक्यातील सरताळे येथील घटना

 • 17 Jun 2021 07:27 AM (IST)

  नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

  नवी मुंबई

  नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

  सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या कोसळधारा

  2 दिवसांच्या विश्रांती नंतर सकाळपासून पावसाची हजेरी

  पावसासह जोरदार धुके समोरचे झाले दिसेनासे

 • 17 Jun 2021 07:27 AM (IST)

  दक्षिण रत्नागिरीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

  रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरी मध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

  पहाटे नंतर पावसाची विश्रांती

  राजापूर शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती

  अर्जुना नदी इशारा पातळी च्या बाहेर

  राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी

  पावसाचा जोर वाढल्यास राजापूर बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता

 • 17 Jun 2021 07:26 AM (IST)

  वसई-विरार परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरु

  वसई विरार

  वसई-विरार परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू

  सकल भागातील रस्त्यावर पाणी साचायाला सुरवात

  आभाळ पूर्णपणे भरलेले असून, दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

 • 17 Jun 2021 07:13 AM (IST)

  भाजप नगरसेविका दुर्गा हत्तीठेले यांचं सदस्यत्त्व रद्द 

  - भाजप नगरसेविका दुर्गा हत्तीठेले यांचं सदस्यत्त्व रद्द

  - अनुसुचीत जातीसाठी आरक्षित जागेवरून आल्या होत्या निवडून
  - ठरावीक वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्त्व रद्द
  - नगरविकास विभागाने केली कारवाई
  - नागपूरात भाजपला धक्का
 • 17 Jun 2021 06:56 AM (IST)

  रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर सुरु

  रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर सुरु

  रत्नागिरी जवळच्या निवळी घाटात वाहतूक झाली होती ठप्प

  घाटात दरड कोसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

  मुसळधार पावसामुळे घडला प्रकार

 • 17 Jun 2021 06:48 AM (IST)

  जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यास हवालदाराने त्याला रुग्णालयात न्यावे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश

  मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आदेश दिले

  कोणतीही जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आली आणि त्याला उपचारांची गरज भासू लागल्यास स्वत: पोलीस ठाण्याच्या हवालदाराने त्याला सरकारी रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले पाहिजे आणि उपचार, मेडिकलनंतर त्याला पोलीस ठाण्यात आणले पाहिजे. तर उर्वरित कार्रवाई नियमांनुसार ते करा

  नगराळे यांनी आपल्या आदेशात लिहिले आहे की यापूर्वी त्यांच्या लक्षात आले आहे की कोणतीही जखमी व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येत असेल तर त्याला रुग्णालयात पाठविण्यात जातात  आणि बर्‍याच वेळा ते स्वत: उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जात असत.

  नगराळे यांनी ते  चुकीचे आहे असं म्हटल आणि असे करू नका सांगितले आणि जखमी व्यक्ती पोलिस ठाण्यात हजर होताच मेडिकल मेमो बनवून त्याला सरकारी रूग्णवाहिकेत रुग्णालयात घेऊन जा.

  त्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितवर कारवाई केली जाईल, असेही नगराळे म्हणाले.

 • 17 Jun 2021 06:41 AM (IST)

  भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राड्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल

  भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राड्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल

  बुधवारी दुपारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी  शिवसेनेच्या चन्दू झगड़े , राकेश देशमुख, अभय तमोरे आणि इतर एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे

  दरम्यान सेना बीजेपी कार्यकर्ता राडा प्रकरण लक्षात घेऊन पुढे काही अप्रिय घटना किंवा कायदा सुव्यवस्थेच प्रश्न उद्भवू नये म्हणून शिवसेना भवन समोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

  एवढंच नव्हे तर भाजपा मुंबई कार्यालय बाहेर ही पोलिस दल तैनात करण्यात आला आहे

 • 17 Jun 2021 06:35 AM (IST)

  घाटात दरड कोसल्याने रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

  रत्नगिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

  रत्नागिरी जवळच्या निवळी घाटात वाहतूक ठप्प

  घाटात दरड कोसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

  मुसळधार पावसामुळे घडला प्रकार

Published On - Jun 17,2021 6:21 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें