Chandrapur Education | एसटी बंदमुळं मामला येथील विद्यार्थ्यांची चंद्रपुरातील शाळा बंद; शिक्षिकेचं शाळा संपल्यानंतर गावात जाऊन ज्ञानदान

चंद्रपूर : ST संपामुळे शाळा बुडालेल्या विद्यार्थ्यांना निशा दडमल 32 किमी ये-जा करत शिकवत आहेत. कुठलाही अधिकचा आर्थिक मोबदला मिळणार नाही, हे ठाऊक आहे. तरीही केवळ ज्ञानदानासाठी निशा दडमल यांनी पुढाकार घेतला. या चंद्रपूरकर शिक्षिकेच्या पुढाकाराने शैक्षणिक वर्तुळ भारावून गेले आहे. त्यांच्या या शिक्षकी वृत्तीचे स्वागत होत आहे.

Chandrapur Education | एसटी बंदमुळं मामला येथील विद्यार्थ्यांची चंद्रपुरातील शाळा बंद; शिक्षिकेचं शाळा संपल्यानंतर गावात जाऊन ज्ञानदान
ज्ञानदानासाठी विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन शिकविणारी शिक्षिका.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:40 AM

चंद्रपूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षिकेची (Teacher) रोज 32 किलोमीटरची ये-जा सुरू आहे. कोरोना काळानंतर सुरू झालेल्या शैक्षणिक सत्राला एसटीच्या संपाचा खोडा बसलाय. अतिदुर्गम भागातील एसटी बंद झाल्या. रोज शाळेत येणाऱ्या मुलांची अडचण झाली आहे. चंद्रपूरच्या भवानजीभाई चव्हाण शाळेतील निशा दडमल या शिक्षिका रोज शाळा सुटल्यावर मुलांना शिकवण्यासाठी मामला या गावात जातात. या उपक्रमाने कुठलाही अधिकचा आर्थिक मोबदला मिळणार नाही हे ठाऊक आहे. केवळ ज्ञानदानासाठी निशा दडमल पुढे सरसावल्या आहेत.  निशा दडमल यांच्या या शिक्षकीवृत्तीचे स्वागत होत आहे. निशा दडमल (Nisha Dadmal) यांनी हा उपक्रम सुरू केल्यावर शाळा भरवायची कुठे? हा प्रश्न ग्रामस्थांनी चुटकीसरशी सोडविला. गावातील हरिदास कोपुलवार (Haridas Kopulwar) यांनी नुकतेच बांधलेले आपले घर यासाठी सहज उपलब्ध करून दिले.

रोजचा प्रवास धोकादायक

शिक्षिका निशा यांची शहरातील चव्हाण शाळा ते मामला हे घनदाट जंगलातील गाव. यातील अंतर 16 किलोमीटर एवढे आहे. अरण्यातून ये-जा करणारी ही वाट त्यांना या वंचित विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचे या भावनेने भयमुक्त करून जाते. त्यांचा रोजचा प्रवास धोकादायक असला तरी या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पुढचे धोके लक्षात घेता त्यांनी हा मार्ग स्वतः निवडला आहे, असं मामला गावचे पालक हरिदास कोपूलवार सांगतात.

शिक्षिका शाळा संपल्यानंतर गावात

शिक्षिका निशा दडमल यांच्या या प्रयत्नाने त्यांना कुठलाही आर्थिक लाभ होणार नाही, हे निश्चित. मात्र जे विद्यार्थी त्यांच्या गावातील वर्गात नियमितपणे हजर आहेत, त्यांना एसटीच्या संपामुळे शिक्षिकाच आपल्याला गावात शिकवण्यासाठी येत होत्या. ही आठवण आयुष्यभर लक्षात राहील. यातूनच नव्या पिढीला शिक्षक आणि शिक्षणाप्रती ओढ व तळमळ निर्माण होईल अशी आशा.

NMC Budget | नागपूर मनपाचे नावीन्यपूर्ण 5 उपक्रम कोणते? जाणून घ्या अर्थसंकल्पात वेगळं काय?

Sharad Pawar : पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शन अखेर उघड; संदीप गोडबोले मुंबई पोलिसांच्या ताब्यात

NMC Budget | नागपूर मनपाचे उत्पन्न कसे वाढणार? आयुक्त राधाकृष्णन यांचा प्लान

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.