ST Bus Strike in Maharashtra : सणासुदीचे दिवस, एसटीचा संप, रेल्वेचं आरक्षण फुल्ल, खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी, प्रवाशांचे हाल आणि लूट एकाचवेळी

दिवाळीच्या दिवसांत एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू होते आणि विशेषत: पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांची सर्रास लूट चालते.

ST Bus Strike in Maharashtra : सणासुदीचे दिवस, एसटीचा संप, रेल्वेचं आरक्षण फुल्ल, खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी, प्रवाशांचे हाल आणि लूट एकाचवेळी
सणासुदीचे दिवस, एसटीचा संप, रेल्वेचं आरक्षण फुल्ल, खाजगी ट्रॅव्हल्सची मनमानी, प्रवाशांचे हाल आणि लूट एकाचवेळी
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:45 PM

जळगाव : दिवाळीच्या दिवसांत एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू होते आणि विशेषत: पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांची सर्रास लूट चालते. सध्या या दोन्ही ठिकाणांसाठीचे खासगी ट्रॅव्हल्सचे दर दोन हजारांवर पोचले असून त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीसह अन्य सणासुदीच्या दिवसांत रेल्वेचे आरक्षण फुल असते. त्यामुळे दर वर्षीच या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्स चालक अवाजवी दर आकारून प्रवाशांची लूट करतात. दीड वर्षापासून कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित आहे, त्यात पॅसेंजर गाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्यांमध्ये प्रवाशांना सामावून घेणे केवळ अशक्य आहे. मात्र, दिवाळीसारख्या सणाला घरी प्रवास करणे आवश्‍यक असल्याने हीच गरज लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष

मनमानी पद्धतीने हा कारभार सुरू असला तरी परिवहन विभागाचे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. परिवहन विभागाचे अधिकारी ‘तक्रार आली तर कारवाई करू…’ या भूमिकेत असून अशा प्रकारांत तक्रारच समोर येत नाही. त्यामुळे परिवहन विभागाचे फावते. हा प्रकार सर्रास सुरू असताना परिवहन विभाग तपासणी, चौकशीची तसदीही घेत नाही. प्रवाशांची लूट मात्र अशीच सुरू राहते.

एसटीचा संप

एसटी महामंडळाच्या शासकीय सेवेत सामावून घ्यावे, वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वात दिवाळीपासून संपावर आहेत. औरंगाबादमधील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांनी रविवारी संपात सहभाग नोंदवला. रविवारी दुपारी टप्प्याटप्प्याने बारा वाजेपर्यंत संपूर्ण बससेवा ठप्प करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभरात शहरातील दोन्ही आगारातील 223 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचे 24 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले तर जिल्ह्यातील सर्वच आगारातील मिळून एकूण 916 बसच्या फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या.

रेल्वेचं आरक्षण फुल्ल

दिवाळीसह अन्य सणासुदीच्या दिवसांत रेल्वेचे आरक्षण फुल असते.दीड वर्षापासून कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित आहे, त्यात पॅसेंजर गाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्यांमध्ये प्रवाशांना सामावून घेणे केवळ अशक्य आहे.

(Strike ST Mahamandal Employee Railway Reservation Full passengers Anguish )

हे ही वाचा :

एसटीचा संप सुरुच, शहरातल्या 223 बसफेऱ्या रद्द, औरंगाबादेत सोमवारी ड्युटीवर रुजू होणाऱ्या प्रवाशांची कोंडी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.