AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती घ्या आणि रिक्षातून मोफत घरी न्या, पंढरपूरच्या गणेशभक्ताची अनोखी सेवा

कोरोना परिस्थितीमध्ये राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. याच परिस्थितीत काही सामाजिक संघटना गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांना मदतीचा हात देत आहे. पंढरपुरातील एका गणेशभक्ताने गणपती बाप्पा घरी पोहचेपर्यंत रिक्षातून मोफत सेवा चालू केली आहे.

गणपती घ्या आणि रिक्षातून मोफत घरी न्या, पंढरपूरच्या गणेशभक्ताची अनोखी सेवा
Pandharpur Devotee
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 2:24 PM
Share

पंढरपूर : कोरोना परिस्थितीमध्ये राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. याच परिस्थितीत काही सामाजिक संघटना गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांना मदतीचा हात देत आहे. पंढरपुरातील एका गणेशभक्ताने गणपती बाप्पा घरी पोहचेपर्यंत रिक्षातून मोफत सेवा चालू केली आहे.

पंढरपुरातील रिक्षाचालक विष्णू शेटे हे आपल्या रिक्षातून एक रुपयाही न घेता घरापर्यंत गणपती पोहोचवण्याती सेवा करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे पंढरपुरातील सर्वसामान्य जनमानसात विष्णू शेटे याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्ष ते अशा प्रकारची सेवा देत आहेत.

सेवेमध्ये खंड पडू दिला नाही

पंढरपुरातील विष्णू शेटे हे सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी अग्रेसर असतात. सध्या डिझेल व पेट्रोलचे वाढलेले दर चिंतेचा विषय असताना देखील विष्णूने मात्र आपल्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही.

कोरोनाकाळात रुग्णांची सेवा

गेल्या पाच वर्षापासून दिव्यांग व महिलांसाठी रिक्षा मोफत देऊन सेवा बजावत आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना परिस्थितीमध्ये रुग्णांनाही हॉस्पिटलपर्यंत पोचण्यासाठी रिक्षातून मोफत सेवा विष्णूने दिली होती.

गणपती घ्या आणि रिक्षातून मोफत घरी न्या

पंढरपुरात आज सकाळपासूनच गणपती बाप्पांना कारखान्यापासून ते भाविकांच्या घरापर्यंत गणपती नेहण्याचे काम विष्णू अगदी आनंदाने करतायत. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यत ही सेवा विनामूल्य असल्याचे रिक्षा चालक विष्णु शेटे यांनी सांगितले.

आतापर्यंत शेकडो भाविकांचे कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता सेवाभावीवृतीने गणपती बाप्पा घरापर्यंत पोहोचण्याचे काम रिक्षाच्या माध्यमातून विष्णू यांनी केलं आहे. यात प्राधान्याने महिला व दिव्यांग व्यक्तींना सेवा देण्याचे काम ते करत आहेत.

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी बाप्पांचं आगमन

ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे.

(Took Ganpati Murti it home for free by rickshaw, a unique service for Ganesha devotees of Pandharpur)

हे ही वाचा :

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | लाडक्या बाप्पाचं आगमन, राज्यभरात गणेशोत्सवाची धूम

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.