AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tea on Farm : गरमा गरम चहा मिळवा शेतात; बांधावरच्या चहाची राज्यभर चर्चा, या चहावाल्याची भन्नाट आयडिया, डॉली चहावाल्याला विसरुन जाल

Bandhavarcha Chaha : डॉली चहावाला देशातच नाही तर जगात गाजत आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील या चहावाल्याने अनोखी शक्कल लढवली. शेताच्या बांधावर गरमा गरम चहाची तलफ भागवणाऱ्या या चहावाल्याची चर्चा रंगली आहे.

Tea on Farm : गरमा गरम चहा मिळवा शेतात; बांधावरच्या चहाची राज्यभर चर्चा, या चहावाल्याची भन्नाट आयडिया, डॉली चहावाल्याला विसरुन जाल
गरमा गरम बांधावरचा चहा
| Edited By: | Updated on: Aug 03, 2024 | 5:30 PM
Share

आतापर्यंत आपण पिझ्झा-बर्गर आणि थंड पेय या सारखे खाद्य पदार्थ फोन वरुन मागितले असतील. परंतु धाराशिवच्या ग्रामीण भागातील तेरमध्ये एका चहावल्याने थेट बांधावरच्या चहाची भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. एक कॉलवर थेट शेताच्या बांधावर चहा देण्याची ही सेवा पंचक्रोशीत नावाजली आहे. ग्रामीण भागात शेतावर चहा मिळणे दुरापास्तच, पण या चहामुळे अनेकांची तलफ थेट बांधावरच भागावली जात आहे. हा चहा सुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमा गरम चहा ग्राहकांना अवघ्या 5 रुपयांत मिळतो. कोण आहे हा चहावाला आणि कसा आहे त्याचा स्टार्टअप?

महादेव माळी यांची भन्नाट आयडिया

धाराशिवच्या तेर येथील महादेव नाना माळी हे गेली 2004 पासून चहाचा व्यवसाय करतात. चहाच्या व्यावसायात नवल काय असं कोणाला ही वाटू शकतं. पण महादेव माळी यांनी हॉटेलात चहा विकणे ही संकल्पनाच बदलून टाकली आहे .तिसरी पास असलेले महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात. ऊन ,वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी,मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम करतात.

हा तर कष्टकऱ्यांचा चहा

त्यांच्या अभिनव संकल्पनेला या परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. शेतात मालक, शेतकरी, मजूर, कष्टकरी राब राबतात. या कष्टकऱ्यांचाच हा चहा आहे. त्याला खास चव आहे. माळी यांना दिवसातून चहासाठी 600 हून अधिक कॉल येतात. विशेष म्हणजे माळी यांना या आवाजाची इतकी ओळख झाली आहे की, कोणत्या शेतातून आणि कोणी फोन केला हे ते केवळ आवाजावरुन ओळखतात. ते फोन करणाऱ्याला नाव सुद्धा विचारत नाही. पण चहा वेळेवर पोहचतो.

तीन किलोमीटर परिसरात गरमा गरम चहा

तेर गावापासून तीन किलोमीटरच्या परिसरात त्यांचा हा व्यवसाय चालतो. सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कमीत कमी दोन हजार कप चहाची विक्री होते. मोटरसायकलवर शेतातील पायवाटा आणि नागमोडी वळणावरुन ते जातात आणि चहा पोहचवतात.

कोविड काळात सुचली आयडिया

कोविड काळात सर्वत्र बंदी होती. ग्रामीण भागात आणि शेतातील मंडळींना बाहेर पडणे अवघड होते. त्यावेळी महादेव माळी यांना शेताच्या बांधावर चहा नेऊन देण्याची आयडिया सूचली. तेव्हापासून ही सेवा सुरु आहे. दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहाची विक्री होते. त्यासाठी त्यांना रोज 50 ते 60 लिटर दूध लागते. तर इतर साहित्यपणे भरपूर लागते. या स्टार्टअपचे सगळीकडे कौतुक होत आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.