आईसोबत कपडे धुण्यासाठी अन् गाळात रुतले; सांगलीत तलावात बुडून भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

अभिजित व सावित्री हे दोघे आपल्या आईसोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते. हे दोघे पण तलावातील पाण्यात खेळत होते. मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचे पाय गाळात रुतले.

आईसोबत कपडे धुण्यासाठी अन् गाळात रुतले; सांगलीत तलावात बुडून भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:16 AM

सांगली : आईसोबत तलावात कपडे धुण्यास गेलेल्या दोघा सख्खा भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जत तालुक्यातील उमराणी येथे घडली आहे. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सावित्री बाबुराव यादव (13 ) इयत्ता 8 वी आणि अभिजीत बाबुराव यादव(11) इयत्ता 5 वी अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या दुर्दैवी मुलांचे नावे आहेत. (The unfortunate death of a brother and sister who drowned in a lake in sangli)

जत तालुक्यातील उमराणी व सिदूर रस्त्यावर यादव वस्ती नजिक कुराण पाझर तलाव आहे. या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या ठिकाणी कपडे धुण्यास व जनावरांना पाणी पाजण्यासाठी लोकांची गर्दी असते. अभिजित व सावित्री हे दोघे आपल्या आईसोबत तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते. हे दोघे पण तलावातील पाण्यात खेळत होते. मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचे पाय गाळात रुतले. दोघांनीही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. काळाने त्यांचा बळी घेतला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.

अहमदनगरमध्ये एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू

पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना चार दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात घडल्या आहेत. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले. पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे. पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ओढ्यातील पाण्यात बुडून पती-पत्नीला प्राण गमवावे लागले. दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजावाडी येथील नाल्यात बुडून बाप-लेकाचा जीव गेला. तर राहुरीजवळील गणपती घाट येथे मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

ढोंगी बाबानं पीडितेला बनवलं वासनांधतेचा शिकार

नालासोपाऱ्यात पाच मुलांच्या ढोंगी बाबाने आजार बरा करतो सांगत एका पीडितेला आपला वासनांधतेचा शिकार बनवलंय. तिचं धर्मपरिवर्तन करून तिच्याशी लग्नसुद्धा केलंय. तिच्यावर तो जवळपास दीड वर्ष अत्याचार करत राहिला. पीडितेच्या घरच्यांकडे हा ढोंगी बाबा आपल्या ड्रायव्हरला तिचा पती म्हणून पुढे करायचा. मात्र पीडितेच्या मोठ्या बहिणीने एका एनजीओला गाठून बाबाचं पितळं उघडं पाडलंय. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात बाबासह बाबाला मदत करणा-या त्याच्या पत्नीवर तसेच त्याचा सहकारी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी बाबालाच फक्त अटक केलीय. (The unfortunate death of a brother and sister who drowned in a lake in sangli)

इतर बातम्या

मुंबईसह महाराष्ट्राच्या डोक्यावर वीज संकट, महावितरण म्हणतं, सकाळ-संध्याकाळ वीज वापर कमी करा, वाचा सद्यस्थिती!

जातपंचायत जाचाला कंटाळून आत्महत्या प्रकरणी आणखी 7 आरोपींना अटक

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.