नवेगांव-नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी; पाच दिवसांत 75500 रुपयांचा महसूल

nagzira wildlife sanctuary | लॉकडाउननंतर मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटकांची नवेगांव-नागझिरा अभयारण्याला पसंती. पाच दिवसांत 75500 रुपयांचा महसूल

नवेगांव-नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी; पाच दिवसांत 75500 रुपयांचा महसूल
नागझिरा

गोंदिया: राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर नवेगांव- नागझिरा व्याघ्र अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. 26 ते 30 जून या 5 दिवसांत तब्बल 459 पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली आहे. या माध्यमातून शासनाला तब्बल 75500 रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्व अभयारण्य बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नियम पुन्हा शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्व अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प उघडण्याची परवानगी दिल्यावर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगांव- नागझिरा व्याघ्र अभयारण्याला 26 ते 30 जून या काळात पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

तब्बल 459 पर्यचकांनी नवेगांव- नागझिरा अभयारण्यात भेट जंगल सफारीचा आनंद घेतला. 87 वाहनांनी प्रवेश घेत वन विभागाला 75 हजार 500 रुपयांचा महसूल मिळवुन दिला आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात पर्यटनस्थळी कलम 144 लागू

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कलम 144 लागु करण्याचे आदेश दिलेत. मात्र, तरीही अनेक पर्यटक या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. आषाढी एकादशीची सुट्टी आणि रिमझिम पडणारा पाऊस यामुळे अनेक पर्यटक खडकवासला धरणाच्या परिसरात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या:

शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, गाळात फसल्याने दोन शाळकरी मुलांचा अंत

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार

(Tourist visit navegaon nagzira wildlife sanctuary)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI