VIDEO: एस. टी. कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, चालक-वाहक निलंबित

पालघरमध्ये केवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बस सावकास चालवण्यासाठी सांगितल्याचा राग येऊन कर्मचाऱ्यांनी एका वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

VIDEO: एस. टी. कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, चालक-वाहक निलंबित
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 30, 2021 | 8:28 PM

मोहम्मद हुसेन खान, पालघर : एस. टी. बस म्हटलं की प्रवाशांची गर्दी आणि वाहकासोबतचा (कंडक्टर) कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद ठरलेलंच. अनेकदा हे वाद सुट्ट्या पैशांपासून तर अगदी तिकीट घेण्यासाठी वाहक एका जागेवर बसून प्रवाशांनाच आपल्याकडे बोलावतो म्हणून होतो. मात्र, पालघरमध्ये केवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बस सावकास चालवण्यासाठी सांगितल्याचा राग येऊन कर्मचाऱ्यांनी एका वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सर्व गंभीर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय.

पालघरमध्ये एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली. एका वयोवृद्ध दाम्पत्याने तब्येतीच्या कारणास्तव आणि खड्ड्यांमध्ये गाडी आदळून होणाऱ्या त्रासामुळे कर्मचाऱ्यांना बस सावकाश चालवण्यास सांगितलं. मात्र, या सूचनेचा राग येऊन बस चालक आणि वाहक महिला यांनी या वयोवृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी चालक गोरखनाथ नागरगोजे आणि वाहक महिला शीतल नितीन पवार बोईसर बस डेपोत काम करतात. त्यांनी ही मारहाण केलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय की वयोवृद्ध जोडपं एसटी स्टँडवर चालत जात असताना महिला वाहक मागून येऊन वृद्धाची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यास सुरुवात करते. त्यानंतर ही महिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास करते. ही मारहाण सुरू असताना वृद्धाची पत्नी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न करते मात्र ती त्यानंतरही मारहाण सुरूच ठेवते.

यानंतर बस चालकही घटनास्थळी येतो आणि या महिला वाहकाला रोखण्याऐवजी वृद्धालाच धरुन ओढतो. चालकाने जोराने वृद्धाला ओढून बस स्थानकाच्या साठलेल्या खराब पाण्यात पाडल्याचंही या सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय. विशेष म्हणजे सीसीटीव्ही शिवाय हा सर्व प्रकार काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये देखील कैद केलाय. यात चालक आणि वाहक शिवीगाळ करतानाही दिसत आहे. तसेच इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करुनही ते वृद्धांवर वारंवार हल्ला करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

हॉटेलमधील काम सोडून धाब्यावर कामाला गेल्याचा राग, संतापलेल्या हॉटेलचालकाची वेटरला जबर मारहाण

CCTV VIDEO | नागपूरच्या अवनी ज्वेलर्समधील दरोडा, मालकाला मारहाण करुन लूट, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

मुंबई APMC फळ बाजारात स्फोट झाला तेव्हा सीसीटीव्ही बंद, बेजबाबदारपणा की षडयंत्र?

व्हिडीओ पाहा :

Video CCTV footage MSRTC ST Bus employee beat Elderly couple in Palghar

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें