हॉटेलमधील काम सोडून धाब्यावर कामाला गेल्याचा राग, संतापलेल्या हॉटेलचालकाची वेटरला जबर मारहाण

आपल्या हॉटेलमध्ये काम करणारा वेटर समोरच्या धाब्यावर कामाला गेला, या रागातून हॉटेल मालकाने वेटरला अ‍ॅल्युमिनियमच्या पाईपने मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

हॉटेलमधील काम सोडून धाब्यावर कामाला गेल्याचा राग, संतापलेल्या हॉटेलचालकाची वेटरला जबर मारहाण
बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 28, 2021 | 7:05 AM

अंबरनाथ : आपल्या हॉटेलमध्ये काम करणारा वेटर समोरच्या धाब्यावर कामाला गेला, या रागातून हॉटेल मालकाने वेटरला अ‍ॅल्युमिनियमच्या पाईपने मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अंबरनाथ तालुक्यातील पाईपलाईन हायवेवर वसार गावाजवळ अश्विनी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काम करणारा अभिषेक पडवळ या वेटरला लॉकडाऊनमध्ये कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे तो अश्विनी हॉटेलच्या समोरच असलेल्या तेजस धाब्यावर कामाला जाऊ लागला. आता अश्विनी हॉटेल पुन्हा सुरू झाल्यानंतर अश्विनी हॉटेलच्या मालकाने त्याला पुन्हा कामावर बोलावलं. मात्र तो समोरच्या धाब्यावरची नोकरी सोडण्यास तयार नव्हता.

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

याचाच राग मनात धरून अश्विनी हॉटेलचे मालक राम वायले आणि विकास ठोंबरे या दोघांनी अभिषेक पडवळ याला त्या धाब्यावर जाऊन अ‍ॅल्युमिनियमच्या पाईपने मारहाण केली. ही संपूर्ण घटना तेजस धाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या मारहाणीत अभिषेक पडवळ यांच्या डोक्याला, पाठीला आणि दोन्ही हातांना दुखापत झाली. या घटनेनंतर अभिषेक याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात अश्विनी हॉटेलचे मालक राम वायले आणि विकास ठोंबरे यांच्याविरोधात भादंवि 324, 323, 504, 506, 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिललाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

(Ambernath hotel owner beat the waiter with an aluminum pipe due to working with another hotel)

संबंधित बातम्या : 

मनमाड हळहळलं ! विहिरीतून पाणी काढत असताना सासूचा तोल गेला, सूनेचा साडीचा पदर टाकून वाचवण्याचा प्रयत्न, पण…..

भाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं

आधी बलात्कार, मग शिक्षा, त्यानंतर स्वेच्छेने लग्न आणि फिरायला नेऊन हत्या, गुंतागुंतीची थरारक कहाणी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें