Nandurbar | पुराच्या पाण्यात स्मशानभूमीतील मृतदेह वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव, वाचा नेमके प्रकरण काय?

पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं.

Nandurbar | पुराच्या पाण्यात स्मशानभूमीतील मृतदेह वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव, वाचा नेमके प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 2:50 PM

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून अनेक नद्यांना पूर देखील आलायं. मात्र, यापावसामुळे पिकांचे मोठे नुकसान (Damage) झाले असून रस्त्यांचे देखील तीन तेरा वाजले आहेत. नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा येथून एक धक्कादायक (Shocking) घटना पुढे येते आहे. नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीत शिवण नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलायं.

वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत

पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील वाघशेप येथील शिवण नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी थेट स्मशानभूमीत शिरल्याने दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. दोन ते तीन मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा दावा वाघशेप येथील ग्रामस्थांनी केलायं. गेल्या तीन ते चार दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाच्या संततधार सुरू आहे. यामुळे नदीला मोठा पूर आलायं.

हे सुद्धा वाचा

स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या प्रवाहात मृतदेह वाहून गेल्याचा दावा

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पाणीसाठा वाढल्याने पाणी शिवण नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे शिवण नदीला पूर आल्याने वाघशेपा गावाच्या स्मशानभूमीत पाणी शिरले. वाघशेपा गावाची स्मशानभुमी ही नदीला लागूनच आहे. 14 ऑगस्ट रोजी स्मशानभूमीत पाणी शिरल्याने पाण्याच्या या प्रवाहात पुरलेले अनेक मृतदेह हे बाहेर आले असुन यातील दोन ते तीन मृतदेह वाहुन गेल्याचा दावा ग्रामस्थांकडुन केल्या जात आहे. याबाबत प्रशासनाने देखील पडताळणीसाठी एक पथक घटनास्थळी पाठवल्याची माहिती मिळते आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.