प्रतिक काळेच्या आत्महत्येमुळे खळबळ, राजीनाम्याच्या मागणीनंतर शंकरराव गडाख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आरोपांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांनी प्रतिक्रिया दिलीय. केवळ राजतीय होतू समोर ठेवून आरोप केले जात आहेत. प्रतिक काळे माझा स्वीय सहाय्यक नव्हता. तो केवळ कॉम्प्यूटर ऑपरेटर होता. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असं गडाख यांनी म्हटलंय.

प्रतिक काळेच्या आत्महत्येमुळे खळबळ, राजीनाम्याच्या मागणीनंतर शंकरराव गडाख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
SHANKARRAO GADAKH
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 7:08 PM

अहमदनगर : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या दंत महाविद्यालियातील कर्मचारी प्रतिक काळे याने 30 ऑक्टोबर रोजी केली होती. ही घटना समोर आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा धारण केलाय. गडाख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केलीय. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांनी प्रतिक्रिया दिलीय. केवळ राजतीय हेतू समोर ठेवून आरोप केले जात आहेत. प्रतिक काळे माझा स्वीय सहाय्यक नव्हता. तो केवळ कॉम्प्यूटर ऑपरेटर होता. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असं गडाख यांनी म्हटलंय.

दोषी असेल तर मला हवी ती शिक्षा द्या

“प्रतिक काळेची आत्महत्या ही एक दुर्दैवी घटना आहे. विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करतायत. प्रतिक हा माझे बंधू प्रशांत गडाख यांच्या संस्थेतील कॉम्प्यूटर ऑपरेटर आहे. तो माझा स्वीय सहाय्यक नव्हता. विरोधकांनी एक तरी पुरावा ‌द्यावा ज्यात मी दोषी आहे हे समोर येईल,” अशी प्रतिक्रिया गडाख यांनी दिली. तसेच मी दोषी असेल तर मला हवी ती शिक्षा द्या. प्रतिकवर माझ्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे,” असे म्हणत गडाख यांनी आरोपांचे खंडण केले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

अहमदनगर जिल्ह्यातील प्रशांत गडाख यांच्या दंत महाविद्यालयात प्रतिक काळे हा युवक काम करत होता. त्याने चार दिवसांपू्र्वी औरंगाबाद रोडवरील झाडीत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ व्हायरल करत आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. प्रतिक काळे हा काही वर्ष प्रशांत गडाख यांचे सहाय्यक म्हणून काम पाहिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केल्याचीही माहिती आहे.

शंंकरराव गाडाख यांनी राजीनाम द्यावा, भाजपची मागणी

प्रतिक काळेच्या आत्महत्येनंतर भाजपने आक्रमक पवित्रा धारण केलाय. शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीय. “प्रतिक काळे या तरुणाने 10 नावं घेतली. त्यातील 7 नावांवर एफआयआर दाखल केली. त्यातील 3 नावांवर मात्र पोलिसांनी आळीमिळी गुपचिळी साधली. जलसंधारण खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांच्यासारख्या नेत्याचं नाव घेऊन एक तरुण आत्महत्या करतोय. 30 तारखेला ही घटना घडलीय. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात अत्यंत अस्वस्थ वातावरण आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची चर्चा तिथे सुरु आहे. हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय,” असा गंभीर आरोप उपाध्ये यांनी केलाय.

अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत!, परमबीर सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ

देगलूरमध्ये भाजपचा पराभव का झाला ? प्रविण दरेकर यांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले…

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन

Non Stop LIVE Update
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.