Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी इच्छुक?.. यांचा मिळणार आम्हाला पाठिंबा, संजय राऊत यांनी तर स्पष्ट सांगितले

Lok Sabha Election 2024 मधील पहिल्या टप्प्यातील मतदान काल देशभरात झाले. आता पुढील चार टप्प्यांत मतदान होईल. मतमोजणी होऊन कुणाचं सरकार आलं, हे जाहीर होईल. पण त्यापूर्वीच संजय राऊत यांच्या या विधानांने राजकीय विश्लेषकच नाही तर सर्वच नेत्यांच्या भुवया वर केल्या आहेत. काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut : उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी इच्छुक?.. यांचा मिळणार आम्हाला पाठिंबा, संजय राऊत यांनी तर स्पष्ट सांगितले
संजय राऊत यांचे विधान चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 11:11 AM

देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. लोकशाहीच्या उत्सवात अनेक भागात, विशेषतः नक्षलवादी भागात विशेष उत्साह दिसून आला. आता पुढील चार टप्प्यानंतर जून महिन्यात निकालांची घोषणा होईल. कोणत्या पक्षाचं सरकार येईल ते स्पष्ट होईल. पण त्यापूर्वीच संजय राऊत यांच्या एका विधानाने सर्वांचेच कान टवकारले आहेत. त्यामुळे निकालापूर्वीच उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत की काय असा सूर तर निघत नाही ना, अशी शंका राजकीय विश्लेषकांना येत आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

इंडिया आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा

देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्वव उजळून निघाला असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

ते भाजपात विलीन होतील

अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होईल, असा टोला त्यांनी हाणला. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर गेले नाहीत, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर असल्याचे ते म्हणाले. हा माझा उमेदवार हा त्याचा उमेदवार असे आम्ही करत नाहीत, 48 जण मविआचा उमेदवार असल्याचे ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर उत्तम भविष्यवाणी करतात

प्रकाश आबेडकर हे कधी कधी खरे बोलतात ते उत्तम भविष्य वाणी करतात, असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकी नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही,भाजपा ढेकर देईल..पंतप्रधान यांना भीती आहे त्यामुळे आता ते सभा घेत आहेत. 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या मोदींना आता घाम गाळावा लागतोय, असा टोला पण त्यांनी हाणला.

पुढच्या सभेला विश्वजीत कदम दिसतील

अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. विश्वजित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत,पण पुढच्या सभेला विश्वजित कदम दिसतील असे संजय राऊत म्हणाले. तर विशाल पाटील यांच्याशी आमचा यावेळेला उत्तम संवाद आहे, असे ते म्हणाले.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.