कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा, मिशन वात्सल्य मोहिमेद्वारे 18 सेवांचा लाभ मिळणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 5:42 PM

कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा, मिशन वात्सल्य मोहिमेद्वारे 18 सेवांचा लाभ मिळणार
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती : कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. (Women who became widows during Corona pandemic will get 18 services through the state government’s Mission Vatsalya campaign)

राज्यात गेल्या दीड वर्षात ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोविडमुळे महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले आहे. कोविड-19 मुळे मार्च 2020 नंतर विधवा झालेल्या महिलांची एकूण संख्या 15 हजार 95 इतकी आहे. त्यापैकी जिल्हा कृती दलाकडे यादी तयार असलेल्या महिलांची संख्या 14 हजार 661 आहे. अशा महिलांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना लागणारी प्रमाणपत्र मिळवून देत 18 विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला आणि बाल विकास विभागामार्फत सुरू आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजने पासून अनेक योजनांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील या महिलांसाठी घरकुल योजनेतही कशा पद्धतीने लाभ देता येईल, याबाबत या वात्सल्य मिशन अंतर्गत काम सुरू असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

मोहिमेअंतर्गत विभागाने दाखल करून घेतलेल्या अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 8,661 महिलांकडून अर्ज दाखल करून घेतले आहेत.
  • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी 405 अर्ज दाखल झाले आहेत.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी 71 अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा यासाठी 1209 महिलांकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी केवळ तीन अर्ज विभागाकडे आले आहेत.
  • या सर्व अर्जांची एकूण संख्या पाहता वात्सल्य मिशन योजनेअंतर्गत आतापर्यंत 10,349 महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत.

इतर बातम्या

VIDEO: बाळासाहेबांच्या जीवाला धोका, पवारांनी सांगितलं ‘मातोश्री’ सोडा, तेव्हा साहेबांनी मलाच बोलावलं; राणेंनी सांगितला ‘तो’ अनुभव

धारावीत सिलिंडर स्फोट, 5 जणांची प्रकृती गंभीर, 8 वर्षाच्या मुलाचा समावेश, तिघांचे चेहरे भाजले; जखमींची यादी एका क्लिकवर

Vaccine Update: दुसऱ्या डोसची तारीख लक्षात आहे ना? जाणून घ्या औरंगाबादेत किती जणांचे झाले दोन्ही डोस पूर्ण

(Women who became widows during Corona pandemic will get 18 services through the state government’s Mission Vatsalya campaign)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI