AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेससोबत राहून इतर पक्षही बर्बाद होतांयत, मोदींची ठाकरे गटावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे, काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं आहे. देशाला गरिबीत ढकलून दिलं. शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. ही देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी आहे. यांच्यासोबत राहणारे देखील बर्बाद होतील अशी टीका मोदींनी केली आहे.

काँग्रेससोबत राहून इतर पक्षही बर्बाद होतांयत, मोदींची ठाकरे गटावर टीका
| Updated on: Oct 05, 2024 | 5:38 PM
Share

पंतप्रधान नरेद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या वेळी ठाण्यात त्यांनी अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. मेट्रो मार्गिका ३ ला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. रविवार पासून ही मेट्रो सेवा सुरु होत आहे. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘महिलांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीपासून सावध राहावं. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा काँग्रेसला देशाच्या विकासापासून काय अडचण आहे असा सवाल केला जात होता. पण सत्तेतून बाहेर पडल्यावर काँग्रेसचा रंग दिसत आहे. काँग्रेसला आता अर्बन नक्षलींची गँग चालवत आहे. काँग्रेस सरकार बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. अपयश आल्यानंतरही ते स्वप्न पाहत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं एकच मिशन आहे. समाजात दुफळी निर्माण करा. लोकांना वेगळं करा आणि सत्ता काबीज करा. आपल्याला भूतकाळातून धडा घ्यायचा आहे. आपल्या एकतेला ढाल करायची आहे. आपल्यात फूट पडली तर आपल्यात फूट पाडणारे मैफल साजरी करतील. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं स्वप्न धुळीस मिळवा. काँग्रेसने देशाला गरीबीत ढकललं आहे. काँग्रेसने महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं. त्यांनी ज्या राज्यात सरकार बनलं त्या राज्यांना उद्ध्वस्त केलं.’

उद्धव ठाकरेंवर टीका

मोदी म्हणाले की, ‘त्यांच्यासोबत राहून इतर पक्षही बर्बाद होत आहे. जे आधी राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगूलचालन करत आहे. आम्ही वक्फ बिल आणलं. पण लांगूलचालून करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवीन चेले आम्हाला विरोध करत आहे. वक्फच्या अवैध जमिनी घेऊ देणार नाही, असं ते म्हणत आहे. वीर सावरकारांवर काँग्रेस टीका करते. तेव्हाही काँग्रेसचे चेले त्यांच्या पाठी उभे राहत आहे. काँग्रेस म्हणते जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू. पण काँग्रेसच्या चेलांची बोलती बंद आहे. नवीन व्होट बँकेसाठी विचारधारेचं एवढं पतन, काँग्रेसची अशी हुजरेगिरी, काँग्रेसचं भूत ज्याच्या अंगात जातं त्याची हीच अवस्था होते.’

काँग्रेसने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं – मोदी

‘काँग्रेस अनेक वर्षापासून हेच करत आले आहे. यांनी महाराष्ट्रात आतापासून रंग दाखवला सुरु केले आहे. लाडकी बहीण योजना सुरु केली आणि तीन एलपीजी सिलेंडर मोफत दिले. हे त्याला पचवू शकत नाहीत. यांना जर सत्ता मिळाली तर हे शिंदेंवर राग काढतील. त्यांचया सर्व योजना बंद करुन टाकतील. लोकांना पैसा मिळू नये पण त्यांच्या दलालांना पैसे मिळो. काँग्रेसचा रंग आता समोर आला आहे. भारताला पुढे जाण्यापासून ते रोखत आहेत. काँग्रेस लोकांना वाटण्याचं काम करते आणि सत्तेत येतात. आपल्याला यातून धडा घेतला पाहिजे. आपण एक राहिले पाहिजे. आपण वाटलो गेलो तर ते मैफील सजवतील. महाविकासाघाडीच्या प्रयत्नाना आपण यशस्वी होऊ देऊ नये. यांनी देशाला गिरीबीत धडकलले. शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. यांच्या संगतीत येऊन इतर पक्ष पण बर्बाद होतात. वक्फ बोर्ड बिलवर हे लोकं विरोध करत आहेत. वीर सावकरांचं हे लोकं अपमान करतात. तरी इतर पक्ष त्यांच्या मागे उभे राहतात. काँग्रेस म्हणते कलम ३७० परत आणणार. तरी हे गप्प बसतात. आज देशाला, महाराष्ट्राला एक इमानदार सरकारची गरज आहे. हे काम फक्त महायुती सरकार करु शकते.’

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.