जागेच्या व्यवहारातून Rajendra Gavit यांना 1 वर्षाचा तुरुंगवास, पावणे 2 कोटींचा दंड

जागेच्या व्यवहारातून Rajendra Gavit यांना 1 वर्षाचा तुरुंगवास, पावणे 2 कोटींचा दंड

Pradeep Garad | Updated on: Feb 14, 2022 | 6:55 PM

खासदार राजेंद्र गवितांना (Rajendra Gavit) एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व एक कोटी 75 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय. राजेंद्र गावित शिवसेनेचे (Shivsena) पालघर (Palghar) लोकसभेचे  खासदार आहेत.

खासदार राजेंद्र गवितांना (Rajendra Gavit) एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व एक कोटी 75 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय. राजेंद्र गावित शिवसेनेचे (Shivsena) पालघर (Palghar) लोकसभेचे  खासदार आहेत. पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी  प्रथम वर्ग न्यायालयानं हा निर्णय दिलाय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावितांनी दीड कोटीचे चेक दिले होते. व्यवसायिक चिराग कीर्ती बाफना यांना हे चेक त्यांनी दिले होते. चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गवितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल करण्यात आला होता. व्यवसायिक चिराग कीर्ती बाफना यांनी राजेंद्र गावित विरोधात न्यायालयात धाव घेतली त्यानंतर न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र गावित यांची अद्याप याप्रकरणी प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र हे चेक बाऊन्स कसे झाले, याचा उलगडा अजून झालेला नाही. बाफना यांनी थेट कोर्टातच धाव घेतली.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us