AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…..तर मुंबई-महाराष्ट्राला कोरोनाची मोठी किंमत मोजावी लागली असती!

ज्या तब्लिग जमातीचा धार्मिक कार्यक्रम दिल्लीत झाला, तसाच कार्यक्रम (Palghar Police deny Tablighi Jamaat event) मुंबईजवळच्या वसईत नियोजित होता.

.....तर मुंबई-महाराष्ट्राला कोरोनाची मोठी किंमत मोजावी लागली असती!
| Updated on: Apr 02, 2020 | 4:16 PM
Share

विरार : मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची व्याप्ती वाढली (Palghar Police deny Tablighi Jamaat event) आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे आकडे वाढतानाच, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्राची कोरोनामुळे होणारी मोठी हानी तूर्तास टाळली आहे.

ज्या तब्लिग जमातीचा धार्मिक कार्यक्रम दिल्लीत झाला, तसाच कार्यक्रम (Palghar Police deny Tablighi Jamaat event) मुंबईजवळच्या वसईत नियोजित होता. वसईत 14 मार्चला हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मंडप उभारण्यासाठी बांबू वगैरे साहित्यही आणलं होतं.

मात्र त्याचदरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका ओळखून, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आणि कोकण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील हजारो तब्लिग जमातीचे लोक सहभागी होणार होते.

जर हा कार्यक्रम 14 मार्चला झाला असता, तर कोरोनाचा कहर केवळ पालघरमध्येच नव्हे तर लगत असलेल्या मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने पसरला असता. त्यामुळे नक्कीच हाहाकार उडाला असता.

दिल्लीतील तब्लिग जमातीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातील लोक गेले होते. जर मुंबईजवळच्या वसईत हा कार्यक्रम असता, तर महाराष्ट्रातील किती लोकांनी हजेरी लावली असती, याचा अंदाज बांधता येईल. वसईतील हा कार्यक्रम झाला असता, तर या कार्यक्रमातील लोक आपआपल्या जिल्ह्यात परतले असते. तर कोरोनाने आणखी किती कहर झाला असता, याची कल्पनाही न केलेली बरी.

मात्र पालघर जिल्हा पोलिसांनी दाखवलेलं प्रसंगावधान किती महत्त्वाचं होतं, हे आजची परिस्थिती पाहून लक्षात येते.

हे वाचा : निजामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’ ‘कोरोना’चा हॉटस्पॉट कसा ठरला?

दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात ‘तब्लिग जमात’तर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’चं प्रसारकेंद्र झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून जमाती सहभागी झाले होते. ‘तब्लिग जमात’मधल्या 19 तब्लिगींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 389 जणांचे ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, राज्यात परतलेल्या 31 तब्लिगींचे ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये पुण्याच्या 20 तर सोलापुरातील 11 जणांचा समावेश आहे. पुण्यातील 10 तब्लिगींचे रिपोर्ट बाकी आहेत. सोलापुरातील तब्लिगींच्या संपर्कातील 14 जणही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. सोलापूरच्या 17 पैकी 11 सहभागी परतले असून उर्वरित 6 तब्लिगींपैकी 2 ठाण्यात, तर 2 पुण्यात (Palghar Police deny Tablighi Jamaat event) आहेत.

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.