AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढलं, 6 वर्षांच्या मुलाच्या ऑपरेशनमध्ये हलगर्जीपणा, पंढरपूर हादरलं

पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक वैद्यकीय हलगर्जीपणा समोर आला आहे. ६ वर्षीय मुलाच्या उजव्या हाताचे दुखरे बोट काढण्याऐवजी डॉक्टरांनी डाव्या हाताचे बोट काढल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉ. वर्षा काणे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून, या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णालयाने चौकशी समिती नेमली असून, अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढलं,  6 वर्षांच्या मुलाच्या ऑपरेशनमध्ये हलगर्जीपणा, पंढरपूर हादरलं
| Updated on: Mar 28, 2026 | 11:46 AM
Share

पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. तेथील उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका प्रकारामुळे सगळेच चक्रावले असून त्याचीच सर्वत्तर चर्चा सुरू आहे. रुग्णालयात आलेल्या 6 वर्षांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटाऐवजी शस्त्रक्रिया करून डाव्या हाताचे बोटच काढलं, असा दावा नातेवाईकांनी केला आहे, यामुळे बराच गदारोळ झाला. डॉ वर्षा काणे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून याबाबत चौकशी समिती नेमली असून समितीचे अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सरडे यांनी सांगितलं आहे. उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट काढल्याच्या आरोपामुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्य उपजिल्हा रुग्णालयात एक सहा वर्षांचा मुलाग आला होता. शाहू सुनील दंदाडे असं त्याचं नाव आहे. या मुलाला दोन्ही हाताला सहा बोटे आहेत. मात्र त्याच्या उजव्या हाताचं बोट दुखत असल्याने ते बोट काढून टाकण्याचा निर्णय झाला. त्यासाठी तो मुलगा रुग्णालयात आला होता. मात्र ऑपरेशनदरम्यान त्या मुलाचं उजव्या हाताचं बोट न काढता, डाव्या हाताचं बोटं काढलं, अशी तक्रार दंदाडे कुटुंबीयांनी केली आहे.

आमचा मुलगा लहान आहे, त्याच्या उजव्या हाताचं बोट दुखत होतं, म्हणून ते काढायला आम्ही इथे रुग्णालयात आलो होतो. पण त्यांनी दुसऱ्याच, डाव्या हाताचं बोटं काढून टाकलं, ते समोर आल्यावर आम्ही डॉक्टरांना सांगितंलही. एका हाताचं बोटं काढायचं, तर तुम्ही दुसऱ्या हातावर ऑपरेशन करून ते बोट काढलंत, त्याबद्दल डॉक्टरांना विचारणा देखील केली. फॉरम्वर आम्ही उजव्या हाताबद्दलच लिहीलं होतं, त्या मॅडमकडे फाईल होती. त्या म्हणाल्या की आज ना उद्या ( त्या उजव्या) हाताचं बोटंही काढाव लागेलचं. पण आम्चायम ुलाच्या उजव्या हाताला त्रास होत होता . कागदामध्ये त्यांनी फेरफार, बदलाबदली केली आहे, असा आरोप त्या मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालय अधीक्षकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये डॉ वर्षा काणे यांनीही शस्त्रक्रिया केली असून याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं वैद्यकीय अधीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. पण मुलाच्या उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट काढल्याचा आरोप होत असल्यामुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे…

Follow Us
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं