AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना ‘परस्पर संबंधावर’ पंकजांचा पाठिंबा नाहीच!; भाजपलाही फटकारले?

गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील संकट टळलं आहे. (pankaja munde reaction on dhananjay munde rape case)

धनंजय मुंडेंना 'परस्पर संबंधावर' पंकजांचा पाठिंबा नाहीच!; भाजपलाही फटकारले?
| Updated on: Jan 25, 2021 | 11:28 AM
Share

औरंगाबाद: गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील संकट टळलं आहे. मात्र, या प्रकरणावरील प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय यांना आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून धनंजय मुंडे कुटुंबातही एकटे पडलेत का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (pankaja munde reaction on dhananjay munde rape case)

काय म्हणाल्या पंकजा?

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर या प्रकरणाला मिळालेल्या नाट्यमय वळणानंतर हे प्रकरण संपलं. मात्र, त्यावरील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया अद्यापही सुरूच आहे. पंकजा मुंडे या आज औरंगाबादमध्ये होत्या. यावेळी त्यांना धनंजय मुंडे प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, ‘तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही’, असं पंकजा म्हणाल्या. पण ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही.

‘कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच’, असंही त्या म्हणाल्या.

मुंडे कुटुंबात एकटे पडले?

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही पूर्णपणे राजकीय आहे. एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाला नैतिकदृष्ट्या पाठिंबा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते योग्यही आहे. पण भाऊ म्हणून त्या धनंजय मुंडे यांच्या पाठी खंबीरपणे उभ्या असणारच, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मुंडे प्रकरणावरून राजकीय वादंग निर्माण झालेलं असताना पंकजा मुंडे यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. किंबहूना त्या काळात त्या मीडियाला सामोऱ्याही गेल्या नाहीत. हा विषय संपल्यानंतर त्या बाहेर पडल्या. आज ना उद्या बाहेर पडल्यानंतर मीडिया या प्रकरणावर प्रश्न विचारणारच हे माहीत असल्याने त्या प्रकरण संपल्यावर मीडियाला सामोरे आल्या. त्यानंतर त्यांनी अत्यंत खुबीने प्रतिक्रिया देऊन या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे. यावरून या संकटाच्या काळात मुंडे कुटुंबीय धनंजय मुंडे यांच्या पाठी खंबीरपणे उभे होते, असं स्पष्टपणे दिसून येत असल्याचंही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (pankaja munde reaction on dhananjay munde rape case)

पंकजांचा भाजपला टोला?

पंकजा मुंडे यांनी याप्रकरणी एक अत्यंत महत्त्वाचं विधान करून भाजपलाही टोले लगावले आहेत. कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा, असं त्या म्हणाल्या. मुंडे प्रकरणी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या प्रकरणाचं राजकीय भांडवलं करण्याचा भाजपने प्रयत्न केला होता. त्यामुळे पंकजा यांनी याप्रकरणावरून एकप्रकारे भाजपला टोला लगावल्याचंही बोललं जात आहे. (pankaja munde reaction on dhananjay munde rape case)

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंच्या ‘परस्पर संबंधा’वर पंकजांनी मौन सोडलं, म्हणाल्या..

खडसेंवरील गुन्हा रद्द होणार?; आज कोर्टात सुनावणी

ओबीसीचा मुख्यमंत्री व्हावा का? पंकजा का म्हणतायत ‘मला थोडं बाजुला ठेवा’!

(pankaja munde reaction on dhananjay munde rape case)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.