पार्थ पवार यांना उमेदवारी द्या अन्यथा… राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट इशारा काय?

Ajit pawar and NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.

पार्थ पवार यांना उमेदवारी द्या अन्यथा... राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट इशारा काय?
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 7:27 AM

किशोर पाटील, जळगाव दि. 14 फेब्रुवारी 2024 |  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड पुकारले होते. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन ते महायुतीत सामील झाले. त्यांच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात गेला. त्यात अजित पवार यांना यश मिळाले.  आता शरद पवार गट  निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना अजित पवार यांना त्यांच्या पक्षातून बंडाचा इशारा दिला आहे. हा इशारा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी दिला आहे.

कोणी दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील, असा थेट इशारा देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

रवींद्र पाटील यांनी केले ट्विट

पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी थेट रवींद्र पाटील यांनी ट्विट केले. एका प्रकारे अजित पवार यांनाच हा थेट इशारा दिला आहे. आता पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात? हे पहावे लागणार आहेत. तर दुसरीकडे आता कार्यकर्त्यांनी थेट पक्षातून बाहेर पडण्याच्या दिलेल्या इशारानंतर अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपलआपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु अजित पवार यांच्या गटातून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी समाजाला राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. तर नवाब मलिक यांनीही राज्यभेत जाण्याची इच्छा आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....