AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा आणि शरद पवार एकच, फक्त भाजपला उल्लू बनवले… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

प्रकाश आंबेडकरांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. दोन्ही पवारांनी भाजपला 'उल्लू' बनवले असून, सत्तेसाठी ते तत्त्वे बाजूला ठेवून वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक निवडणुकीत पवार गट एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आंबेडकरांनी राजकारणातील तत्त्वहीन युतींवरही तीव्र टीका केली आहे.

अजितदादा आणि शरद पवार एकच, फक्त भाजपला उल्लू बनवले... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अजित पवार - शरद पवार
| Updated on: Jan 09, 2026 | 1:14 PM
Share

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र आले आहेत. अजितदादा सत्ताधारी आघाडीत आहेत. तसेच दोन्ही पवार गटामध्ये पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून कोर्टात वाद सुरू आहे. असं असताना दोन्ही पवार निवडणुकीत एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील एका बड्या नेत्याने तर दोन्ही पवार एकत्रच असून ते फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथील जाहीर सभेतून अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही पवार एकच आहेत. मात्र त्यांनी भाजपला उल्लू बनवलं आहे. मी मागच्यावेळीही म्हटलं होतं की अभद्र युत्या तुम्हाला पाहायला मिळतील. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. सत्तेसाठी भाजपनं तत्त्व सोडलं आहे. तर एमआयएमने आरएसएस विरोध सोडला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचीही अंबनरनाथमध्ये भाजपसोबत युती झाली आहे. पक्ष, विचर आता महत्वाचा नाही. सत्तेततून मिळणारे टेंडर हेच महत्वाचे राहिलेत असं वाटतंय, असा हल्ला प्रकाश आंबेडकर यांनी चढवला.

मी आधीच म्हटलं होत की हे दोघे वेगळे नाहीतच, फक्त त्यांनी भाजपला उल्लू बनवलं. चौकशी लागली होती म्हणून एक जण भाजपसोबत गेला. स्वतःवरची चौकशी थांबवली. एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यावर आठवण करून देतायत की 70 हजार कोटीची फाईल पेंडिंग आहे. आम्ही उलट भाजपला विचारतोय तुम्ही एवढे दिवस फाईल दाबली का? यांचा खुलासा करा. जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे, पण पुण्यात, ठाण्यात युती नाही. यांचा राजकीय अर्थ असं काढतोय की भाजपला दोघांना (सेना-राष्ट्रवादी) संपवायचं आहे. म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. पण किती यशस्वी होतील या बाबत शंका आहे, असंही त्यांनी म्हटलं.

24 तास झाले तरी…

अभद्र युतीची सरकारे लोकांनी दूर ठेवली पाहिजे. काँग्रेस आणि वंचित दोघे सेक्युलर आहेत, त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली. फडणवीस यांनी अकोटमध्ये कारवाई करण्याचा इशारा दिला. 24 तास झाले तरी काहीही झाले नाही, असा चिमटा प्रकाश आंबेडकर यांनी काढला.

अनैतिक सरकारांना…

एकीकडे देशावर संकट आलंय. दुसरीकडे देश चालवणारे अनैतिक पद्धतीने सत्तेत येत आहेत. मतदारांना एवढंच सांगणं आहे की, अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे बाजूला ठेवा. तरच शहराचे प्रश्न सूटतील. परिवहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहेत. पण त्याची आखणी झाली नाही, असंही ते म्हणाले.

लवकर समजेल…

सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्य आहे. ते जे बोलले खर बोललेत, तुम्हाला लवकर समजेल. कोणाच्या रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना. कोणी किती एकनिष्ठ आहे लवकर समजेल, असं त्यांनी सांगितलं.

शिंदेंचा सोलापुरात दबाव

बिनविरोध निवडीवरूनही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे. सुशीलकुमार शिंदेनी बिनविरोध व्हावं म्हणून प्रचंड प्रयत्न केला. मलप्पा शिंदे नावाच्या व्यक्तीला मारपीट करून त्याच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमचे निम्मे उमेदवार भीतीमुळे फॉर्म भरायला आले नाही, असा आरोप त्यांनी केला.

कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.
नाशिक दत्तक घेण्याच्या आश्वासनावरून राज ठाकरेंचा रोख नेमका कुणावर?
नाशिक दत्तक घेण्याच्या आश्वासनावरून राज ठाकरेंचा रोख नेमका कुणावर?.
इतका चुकीचा कॅरम फुटलाय की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भो$@- राज ठाकरे
इतका चुकीचा कॅरम फुटलाय की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भो$@- राज ठाकरे.
राज-उद्धव एकत्र येणे ही फक्त राजकीय घडामोड नाहीतर..राऊतांचा गौप्यस्फोट
राज-उद्धव एकत्र येणे ही फक्त राजकीय घडामोड नाहीतर..राऊतांचा गौप्यस्फोट.
मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचा प्रहार
मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचा प्रहार.