AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा दणका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, पुन्हा भडकले दर, तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतात बघायला मिळत आहे. महागाई वाढताना दिसत आहे. त्यामध्येच मुंबईत आता CNG आणि PNG महाग झाले. हा मोठा दणका सर्वसामान्यांना म्हणावा लागेल. कारण थेट रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होण्याचे संकेत आहेत.

मोठा दणका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, पुन्हा भडकले दर, तब्बल..
CNG and PNG prices increase
| Updated on: May 30, 2026 | 8:11 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम देशात बघायला मिळतोय. भारताला या युद्धाची झळ बसत आहे. गॅसचा तुटवडा आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच चालले तर भारतात अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. थेट महागाई वाढताना दिसत आहे. मुंबईत आता CNG आणि PNG महाग झाले. हा मोठा दणका सर्वसामान्यांना म्हणावा लागेल. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) आजपासून CNG आणि PNG च्या दरात वाढ लागू करण्यात आली. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत वाढ होताना दिसतंय. CNG चा दर प्रति किलो ₹84 वरून ₹86 करण्यात आला. ही एक मोठी वाढ म्हणावी लागेल. दोन रूपयांनी वाढ करण्यात आली. प्रति किलो मागे. PNG (घरगुती पाइप गॅस) चा दर ₹51.50 वरून ₹52 प्रति युनिट झाला.

मे महिन्यात CNG दरवाढीची ही दुसरी फेरी आहे. 13 मे रोजीही ₹2 प्रति किलो वाढ झाली होती. एप्रिलमध्येही CNG दरात ₹1 प्रति किलो वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा वाढ करण्यात आली. सततच्या दरवाढीमुळे ऑटो, टॅक्सी आणि बस चालकांवर आर्थिक भार वाढणार. ज्यामुळे भांडे वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांना प्रवासाकरिता अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात.

मुंबई रिक्षामेन्स युनियनने भाडेवाढीची मागणी केलीये. इंधन खर्च वाढल्याने ऑटो-टॅक्सीच्या मूळ भाड्यात वाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे मत. ज्यामुळे भाडे वाढण्याची दाट शक्यता आहे. टॅक्सी संघटनांनी किमान ₹2 ते ₹3 भाडेवाढीची मागणी केली आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागामार्फत MMRTA कडे पाठवला जाणार. ही भाडेवाढ झाली तर थेट ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

CNG दरवाढीचा परिणाम मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण MMR परिसरातील प्रवाशांवर होणार. PNG दरवाढीचा फटका 31 लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना बसण्याची शक्यता. जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीतील अडथळे, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे गॅस खरेदी खर्च वाढल्याचे MGL चे स्पष्टीकरण.

Follow Us
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल.
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न......
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर...
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.