AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक थेंबही पाणी देणार नाही.. पाकिस्तान तरसला, भारत बांधणार 2 मोठे बोगदे, तब्बल 2600..

भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा मोठा थयथयाट बघायला मिळत आहे. पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले. त्यामध्येच भारताने मोठा निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला. ज्याने पाकिस्तानच्या हाती आता काहीच राहिले नाही.

एक थेंबही पाणी देणार नाही.. पाकिस्तान तरसला, भारत बांधणार 2 मोठे बोगदे, तब्बल 2600..
Indus Water Treaty
| Updated on: May 30, 2026 | 7:52 AM
Share

भारताने सिंधु जल करार स्थगित करून आता वर्ष होत आहे. मात्र, जागतिक मंचावर फक्त थयथयाटाशिवाय पाकिस्तान काहीच करू शकला नाही. जागतिक न्यायालयाने निकाल जरी या प्रकरणात पाकिस्तानच्या बाजूने दिला असला तरीही भारताने त्या निकालाला केराची टोपली दाखवली आहे. यासोबतच भारताने फक्त पाकिस्तानला जाणारे पाणीच रोखले नाही तर यासोबतच एक मोठा प्लॅन तयार केला. ज्याने पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी इतर ठिकाणी वळवले जात आहे. त्याकरिता 2600 करोड भारत खर्च करत आहे. पाण्यासाठी तरसणारा पाकिस्तान सर्वकाही बघत आहे. पण भारताचे काहीच वाकडे करू शकत नाही. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित केला. ज्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला. पाणी रोखल्याने पाकिस्ताना भीषण स्थिती आहे. अनेक प्रयत्न या करारावरील स्थगिती काढण्याकरिता पाकिस्तानने केले.

भारताने पाकिस्तानात जाणारे पाणी भारतात वळवण्याकरिता मोठे काम हाती घेतले. याला वेळ आणि पैसा दोन्ही लागणार आहे. सिंधु जल करारानुसार, सहा नद्यांपैकी तीन सिंधु, झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यावर 80 टक्के अधिकार पाकिस्तानचा. ब्यास, सतलुज आणि रावी नदीच्या पाण्यावर 80 टक्के अधिकार भारताचा. मात्र, भारताने पहलगाम हल्ल्यानंतर हा करार स्थगित केला आणि पाकिस्तानात जाणारे पाणी रोखले.

पुढील तीन वर्षात या नद्यांचे पाणी भारतात वापरले जाईल. पण पाणी रोखणे साधे काम नाही. चेनाबचे पाणी व्याबमध्ये आणले जाईल. सलाल बंधाऱ्यातील गाळ काढण्याकरिता तब्बल 2600 करोडचा खर्च आहे. सलाल हायडाइलेक्ट्रिक योजनेला तब्बल 268 करोडचा खर्च येणार आहे. येथे नवीन डायवर्जन कम सेडिमेंट बायपास टनल बनेल. दोन मोठे बोगदे बनणार आहेत. पहाडावरील मातीमुळे सलाल धरणामध्ये गाळ जमा आहे.

भारताकडे सर्व योजना तयार आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले. हेच नाही तर पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार असून त्याच्या नशीबात साधे पाणीही नसणार आहे. भारतावर पहलगाम हल्ला करून पाकिस्तानने अत्यंत मोठी चूक केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तानला माफ करणार नाही. भारताने सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानात मोठी पाणी टंचाई बघायला मिळतंय.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल