AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट! PSI बदने याच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, थेट…

Phaltan Doctor Death Case: फलटणमध्ये एका डॉक्टर तरूणीने तळ हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. आता त्याच्यावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट! PSI बदने याच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, थेट...
crime Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 11:37 AM
Share

साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. बीडमधील एका डॉक्टर तरूणीने तळ हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. आता त्याच्यावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील सहभाग समोर आल्यानंतर बदनेला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

गोपाळ बदनेवर सर्वात मोठी कारवाई

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून केले बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

हातावर सुसाईड नोट

महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहीली होती. माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाळ बदने हा जबाबदार आहे, त्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच, प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं.

या PSI गोपाल बदनेचे इतरही अनेक कारनामे समोर आले होते. त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला होता अशी माहिती समोर आली आहे. PSI बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा, एवढंच नव्हे तर त्यांना डोळाही मारायचा असाही धक्कादायक खुलासा झाला आहे.

कोण आहे PSI बदने ?

  • गोपाळ बदने हा गेल्या 2 वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
  • याआधी तो फलटण तालुक्यातील बरड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता.
  • गोपाळ बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी असल्याचे समजते.
  • गोपाळ बदने हा विवाहीत आहे

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.