बुलडाणा: मद्यधुंद पोलिसाचा फटाका बाजारात गोंधळ; व्हिडीओ व्हायरल

दारूच्या नशेत पोलिसाने गोंधळ घातल्याची घटना जिल्ह्यातील खामगावमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणेश डुकरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बुलडाणा: मद्यधुंद पोलिसाचा फटाका बाजारात गोंधळ; व्हिडीओ व्हायरल


बुलडाणा – दारूच्या नशेत पोलिसाने गोंधळ घातल्याची घटना जिल्ह्यातील खामगावमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणेश डुकरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. फटाका बाजारातील हा व्हिडीओ आहे. फटाका बाजार सुरू ठेवण्यासाठी रात्री दहापर्यंत परवानगी असताना देखील डुकरे हे रात्री साडेनऊच्या सुमारास बाजारात पोहोचले, त्यांनी फटाक्यांचे दुकाने बंद करावेत असे दुकानदाराला सांगितले. ते त्यावेळी दारूच्या नशेत होते. डुकरे यांनी आपला युनिफॉर्म देखील त्यावेळी परिधान केलेला नव्हता. मी पोलीस आहे, तुमच्या पाया पडतो पण दुकाने बंद करा असे ते येथील व्यापाऱ्यांना म्हणत होते. मात्र रात्री दाहापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने दुकानदारांनी दुकाने बंद करण्यातस नकार दिला. हा गोंधळ रात्री दहापर्यंत सुरू होता. यातीलच एका व्यापाऱ्याने  हा व्हिडीओ चित्रीत केला आहे.

दरम्यान रात्री दहा वाजता या प्रकाराची माहिती पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच डुकरे यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून, कारवाईचा अहवला पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती खामगावचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे. आता या प्रकरणात दत्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार?

गेल्याच महिन्यात अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची बुलडाणा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. नियुक्ती होताच त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, आपल्या भागातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. तसे न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाईचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र आता पोलीस कर्मचाऱ्यानेच दारू पेऊन गोंधळ घातल्याने दत्त हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

संबंधित बातम्या 

राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?

अनिल देशमुखांच्या मुलाला अटकेची भीती; कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI