नव्याचे नऊ दिवस असतात, अजित पवारांचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा

माढ्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शह दिला आहे.

नव्याचे नऊ दिवस असतात, अजित पवारांचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा

पुणे :  बारामतीच्या पाण्यावरुन मोठं राजकारण रंगलं आहे. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारं 60 टक्के पाणी बंद करण्याची मागणी केली आहे. त्यावर शरद पवारांनी पाण्याचं राजकारण करु नये असं म्हटलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही याबाबत टीव्ही 9 कडे  प्रतिक्रिया दिली आहे. “पाण्यावरून कोणी राजकारण करू नये. नव्याचे नऊ दिवस असतात. आम्ही त्यावर काही वाद घालू इच्छित नाही”, असं म्हणत अजित पवारांनी माढयाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर टीका केली.

दरम्यान, माढ्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शह दिला आहे. निरा डाव्या कालव्यातून बारामातीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सरकारला पाण्यावर राजकारण करु नका, असा सल्ला दिला.

निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने, बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन दिवसात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात लेखी आदेश काढणार आहेत.

रोहित पवारांवर प्रतिक्रिया

दरम्यान, अजित पवार यांना रोहित पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित पवारांच्या उमेदवारीसंदर्भात पक्ष निर्णय घेईल, आणि हे रोहितनेही सांगितले आहे, असं अजित पवार म्हणाले.

याशिवाय पार्थ पवाराच्या पराभवाला मीच जबाबदार, त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, अशी कबुली अजित पवारांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत सर्वांना सोबत घ्यायचे, पण काहींना सोबत यायचंच नाहीय, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या वंचित आघाडीवर निशाणा साधला.

दुष्काळावर आम्ही राजकारण करत नाही. मोदींच्या शपथविधीला शरद पवार का गेले नाहीत, त्याबाबत पवारांशी माझी चर्चा झालेली नाही. पण काय कारण होते ते मला माहित नाही, असं अजित पवार म्हणाले.

सरसकट कर्जमाफीची आमची मागणी आहे. या अधिवेशनात आम्ही ती मांडणार आहोत, असं ते म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात. डॉ पायलची हत्या की आत्महत्या आहे, हा मुद्दा अधिविशेनात घेणार, असं त्यांनी नमूद केलं.

पायल रोहतगी सारखे कुणीही काहीही वक्तव्य करतायत, कुणाचा कुणावर वचक राहिला नाही, असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर टीका केली.

संबंधित बातम्या 

नीरेच्या पाण्यावरुन उद्धव ठाकरेंचा पवारांच्या सुरात सूर

बारामतीला निरेतून मिळणारं पाणी बंद, दोन रणजतिसिंहांचा पवारांना शह 

रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह  

दुष्काळ दौऱ्यात सत्कार स्वीकारणार नाही, अजित पवारांचा निर्णय 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI