AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी पक्ष अजिबात जिवंत नाही… प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका, थेट मोशीत जात..

पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात मोठी दुर्घटना घडली. गेल्या 44 तासांपासून बचावकार्य सुरू आहे. मात्र, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. यादरम्यानच प्रकाश आंबेडकर मोशी येथे पोहोचले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

विरोधी पक्ष अजिबात जिवंत नाही... प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका, थेट मोशीत जात..
Prakash Ambedkar
| Updated on: Jul 10, 2026 | 10:57 AM
Share

पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले असून आणखीन काही जण अडकली आहेत. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, लष्कराचे जवान, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथके सातत्याने कार्यरत असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या 44 तासांपासून बचावकार्य सुरू आहे, पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यात यश मिळत नाहीये. नागरिकांचा मोठा संताप बघायला मिळतो. जर एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर लगेचच काम झाले असते, असा आरोप केला जात आहे. यादरम्यानच आता प्रकाश आंबेडकर हे मोशी येथे पोहोचले. प्रकाश आंबेडकरांकडून पाहणी करण्यात आली.

यादरम्यान बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, याचे मॅनेजमेंट व्यवस्थित करावे लागेल हे यामधून दिसत आहे. कामगारांचे नुकसान झाले, कामगार गेले ही एक दुखद बाब आहे. याचे मॅनेजमेंट व्यवस्थित झाले पाहिजे, असे मला वाटते. सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. छोटी महापालिका असली तरीही हा कचऱ्याचा प्रॉब्लेम सगळीकडेच येत आहे. याच्यामध्ये सल्यूशन देणे महत्वाचे आहे. मागेही मी याबाबत बोललो होतो. जोपर्यंत तुम्हाला याची एक्सपर्ट कमिटी करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला जुन्या पद्धतीनेच त्यावर प्रक्रिया करावी लागेल.

14 से टन पिंपरी चिंचवड महापालिकेचा कचरा आहे, माझ्या माहितीनुसार. त्याकरिता पहिल्यांदा तेवढा कचरा साठवण्यासाठी तुम्हाला जागा लागेल. कामगार आणि ढगारा वेगवेगळ्या ठिकाणी असला पाहिजे, हे मला माहिती आहे. म्हणून महापालिकेने स्वत:च्या जागा विकत घेतल्या पाहिजेत. तिथे लोकवस्ती नसणार हे देखील बघितले पाहिजे. कचरा डेपोच्या बाजूला बिल्डिंग असू शकत नाही.

जे कुटुंब आहे, त्यांना न्याय कसा मिळेल, हे आम्ही बघू. मुख्यंत्र्यांसोबत बसून हा जो घनकचरा जो आहे त्याबाबत गॅसिफिकेशन जी पद्धत आली आहे, त्यामधून वेगळा मार्ग काढला पाहिजे, असे मला वाटते. ठेकेदार यामध्ये गुन्हेगार आहेच. ठेकेदारवर गुन्हे दाखल होणारच. महापालिकेचे अधिकारीही यामध्ये येणारच.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी थेट म्हटले की, तुम्हाला वाटते का विरोधीपक्ष जिवंत आहे? अजिबात विरोधी पक्ष हा जिवंत नाहीये. तो मृत अवस्थेत आहे. हे युद्धपातळीवर केले पाहिजे होते, आतापर्यंत बॉडी काढल्या पाहिजे होत्या. जमिनीखाली माणूस जिवंत आहे का? हे कळत यंत्राने.. मी अधिकाऱ्यांना म्हटलो की, माणूस जिवंत आहे की नाही हे तुम्ही नातेवाईकांना सांगा..

Follow Us
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन