तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको; राज्यातील जमावबंदीला भाजपचा विरोध

राज्य सरकारने आजपासून येत्या 15 एप्रिलपर्यंत राज्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. (pravin darekar slams maha vikas aghadi over new corona guidelines)

तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको; राज्यातील जमावबंदीला भाजपचा विरोध
Pravin Darekar

नाशिक: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून येत्या 15 एप्रिलपर्यंत राज्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी सर्व काही आम्हाला हवं आहे. परंतु तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम करू नका, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला सुनावले आहे. (pravin darekar slams maha vikas aghadi over new corona guidelines)

प्रवीण दरेकर यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. जुलमी पद्धतीने कामकाज करता येणार नाही. लॉकडाऊन, संचारबंदी सर्व आम्हाला हवं आहे. मात्र तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम करू नका, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

एसीत बसून जीआर काढू नका

अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीत नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटलं म्हणून एसीमध्ये बसून जीआर काढला, असं होता कामा नये, लॉकडाऊन किंवा संचारबंदी करताना लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, असं दरेकर म्हणाले.

आजपासून राज्यात जमावबंदी

दरम्यान, राज्यात आजपासून रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून राज्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहेत. तसेच नव्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नागरिकांना या नव्या निर्बंधांचे पालन सक्तीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहेत नव्या गाईडलाईन

>> आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

>> आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

>> मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

>> आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

>> सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही. नाट्यगृहे आणि हॉल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत. अशा प्रकारे कुणी कार्यक्रम केल्यास कारवाई करमअयात आली. तसेच संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येील.

>> लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

>> अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी राहील. त्यापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येईल.

>> धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. तसेच मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे.

>> काही बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल. मात्र त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. (pravin darekar slams maha vikas aghadi over new corona guidelines)

 

संबंधित बातम्या:

मुंबईतील बाजारात प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही; लॉकडाऊनला निमंत्रण?

लस कशी काम करते, दुसरा डोस कधी घ्यावा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

(pravin darekar slams maha vikas aghadi over new corona guidelines)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI