केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांना पुरस्कार, 5 राष्ट्रपती पदक

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर (Presidential Police Medal Maharashtra) करते.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांना पुरस्कार, 5 राष्ट्रपती पदक

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात येणार आहे. तर 14 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 पोलीस पदक जाहीर झाली आहेत. (Presidential Police Medal Maharashtra)

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यातील 80 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) तर 215 पोलिसांना पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदक मिळाली आहेत.

देशातील 80 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे अभिनंदन

“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” असेही त्यांनी म्हटले आहे.(Presidential Police Medal Maharashtra)

संबंधित बातम्या : 

लाल किल्ल्यावर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला लॉकडाऊनचा फटका, नांदेडमधील झेंडा उत्पन्नात तब्बल 60 टक्के घट

मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय, लवकरच मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख आणि नोकरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *