AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेब अन् उद्धव ठाकरे, संजय राऊत… शिंदे गटाचे खोचक ट्विट

Eknath Shinde and uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. कलम ३७० रद्द केले. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना तुम्ही औरंगजेब म्हणतात. पण याकुब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणारे कोण ? औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही. भावाला सोडलं नाही, अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे?

औरंगजेब अन् उद्धव ठाकरे, संजय राऊत... शिंदे गटाचे खोचक ट्विट
eknath shinde uddhav thackeray
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 22, 2024 | 12:16 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराची पातळी पुन्हा खालवत आहे. बुलढाणा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेब यांच्याशी केली. सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोदी नाही, औरंगजेब म्हणा. औरंगजेब याचा जन्म हा नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला आहे. त्यामुळे दोघांचीही विचारसरणी सारखी आहे. शिवसेना उबाठाच्या या टीकेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. त्यांनी प्रचारसभेत त्याचे उत्तर दिले होते. मला १०४ शिव्या आत्तापर्यंत दिल्या गेल्या आहेत. त्यात आता औरंगजेब ही भर पडली, असा टोला नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उबाठाला लगावला होता. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना डिवचणारे ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे औरंगजेबच्या मांडीवरवर बसलेले असून संजय राऊत पाय चेपत असल्याचा ट्विट केले आहे.

काय आहे ट्विट

शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला डिवचणारे ट्विट X वर करण्यात आले आहे. त्या ट्विटमध्ये कार्टून दिले आहे. त्यात औरंगजेब दाखवला असून त्याच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसलेले दिसत आहे. तसेच संजय राऊत पाय चेपत आहे. ‘शुक्रिया बच्चो, तुमने मुझे फिर जिंदा कर दिया’, असे कॅप्शन या पोस्टला दिले आहे. तासाभरातच ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार टीका

उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी भाषणात म्हटले की, उबाठाला मोदी द्वेषाने पछाडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. कलम ३७० रद्द केले. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना तुम्ही औरंगजेब म्हणतात. पण याकुब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणारे कोण ? औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही. भावाला सोडलं नाही, अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे? हे सगळ्यांना माहिती आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा