AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीपीई किट सहज उपलब्ध करणं शक्य, पृथ्वीराज चव्हाणांचा महत्त्वाचा सल्ला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीत पीपीई किट संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली (Prithviraj Chavan on Corona).

पीपीई किट सहज उपलब्ध करणं शक्य, पृथ्वीराज चव्हाणांचा महत्त्वाचा सल्ला
| Updated on: Apr 09, 2020 | 3:35 PM
Share

मुंबई : “औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडे पीपीई किट असतातच (Prithviraj Chavan on Corona). विशेषत: जैविक औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडे हे किट असतातच. त्यांना विनंती करुन सरकारने त्यांच्याकडचा स्टॉक घेतला पाहिजे आणि डॉक्टरांना दिला पाहिजे. हे अशक्य नाही”, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी पीपीई किट संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती (Prithviraj Chavan on Corona).

“डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीटची अत्यंत आवश्यकता आहे. राज्य सरकार स्वत: लगेच पीपीई किट निर्माण करु शकत नाही. केंद्र सरकारने आपली सर्व ताकद लावून सर्व सरकारी कंपन्या वापरुन ही यंत्रणा उभी केली पाहिजे”, असं चव्हाण म्हणाले.

“परदेशातून स्टॉक मागवाला पाहिजे. आपल्याला काही लोक मदत करायला तयार आहेत. ती मदत घेतली पाहिजे. परंतु, पीपीई नाही म्हणून एखाद्या डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर ते अतिशय दुर्दैवी असेल”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

‘खासगी डॉक्टरांनाही विमा द्या’

‘केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसकरता विम्याची योजना सुरु केली आहे. खासगी क्षेत्रात जे डॉक्टर आणि नर्सेस कोरोनाशी लढतात त्यांनी काय घोडं मारलं आहे? त्यांनाही सरकारने या विमा योजनत घ्यायला हवं, अशी माझी जाहीर मागणी आहे’, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Corona : कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स, पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात 18 नेत्यांना जबाबदारी

“जे दातांचे किंवा डोळ्यांचे डॉक्टर आहेत त्यांना आपण कोरोनाविरोधात लढायला सांगितलेलं नाही. खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर कोरोनाविरोधात लढत आहेत. त्यामुळे यात विभागणी करुन त्यांनाही विम्याचं संरक्षण दिलं पाहिजे. सरकारी आणि खासगी डॉक्टरांमध्ये भेदभाव करणं योग्य नाही”, असं चव्हाण म्हणाले.

“22 लाख सरकारी डॉक्टरांच्या विमा योजनेसाठी 128 कोटी रुपये लागले आहेत. खासगी क्षेत्रात दुप्पट डॉक्टर असतील. आणखी 250 कोटी लागतील. आपण एवढा मोठा खर्च करतोय. मग कोरोनाच्या लढाईत जे फ्रंटलाईनवर मेहनत घेत आहेत त्यांना विम्याचं संरक्षण दिलं पाहिजे”, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

‘…तर अतिशय भयानक परिस्थती दिसली असती’

“कोरोनाचा प्रश्न मोठा आहे पण राज्य सरकार आपल्यापरिने मदत करताना दिसत आहे. मुंबई, पुणे यांसारखे शहरं प्रचंड लोकसंख्येची घनता असलेली शहरं आहेत. देशातून, विदेशातून आलेले लोक येथे राहतात. त्यांचं ट्रेसिंग करणं फार सोप्पं नाही, हे मान्य केलं पाहिजे. आपण उपाययोजना केल्या नसत्या तर काय झालं असतं? यापेक्षा अतिशय भयानक परिस्थती दिसली असती”, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं.

हेही वाचा : कोरोना संकटकाळात सरकारचा पेचही सुटला, उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

“परिस्थितीचा सामना करताना प्रगत राष्ट्रांइतकी क्षमता आपल्याकडे नाही, हे मान्य केलं पाहिजे. आपण हाताने किंवा लोक स्वत: मेहनत घेऊन, तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका ट्रेसिंग करत आहेत. चाचणीच्याबाबत आपली यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे अमेरिका किंवा युरोप खंडातले देश जसे परिस्थितीशी सामना करत आहेत त्याप्रमाणे आपल्याला करता येत नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. तरीही सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून चांगले उपाययोजना केल्या जात आहेत”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

‘केंद्राने सर्व राज्यांना सूचना दिल्या पाहिजेत’

“माझी केंद्राकडून एकच अपेक्षा आहे. केंद्राने सर्व राज्यांकरता काही सूचना दिल्या पाहिजेत. मास्क घालायचं की नाही? काही औषधी घ्यायच्या का नाहीत? अशाप्रकारचे संभ्रम आहेत. किटला मान्यता अमेरिकन एफडीएची, युरोपच्या सीएची पाहिजे की साधा टेस्टिकची चालेल? कोण टेस्ट करतं? त्याची किंमत किती? याचा खर्च महात्मा जोतिबा फुले आरोग्यदायी योजनेतून होणार आहे की नाही होणार? या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारकडून द्यायला पाहिजेत. मग राज्य सरकारने ते अंमलात आणायची सक्ती केली पाहिजेत. मला यात थोडीशी विसंगती दिसत आहे”, असं चव्हाण म्हणाले.

हेही वाचा : ना महाराष्ट्र, ना तेलंगणा, ‘या’ राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन

‘देशात व्हेंटिलिटर्सचा पुरेसा साठा’

“व्हेंटिलेटर्स तयार करणं हे राज्य सरकारला कितपत शक्य आहे ते मला माहिती नाही. पण याची निर्मिती करायच्या यंत्रणेबाबत केंद्र सरकारने काही पावलं उचलली आहेत. त्यांनी रक्षा उत्पादन संशोधनला आदेश दिले आहेत. काही मोठ्या कंपन्यांना सांगितलं आहे की, आपलं उत्पादन बंद करुन व्हेंटिलिटर्स तयार करा. त्यामुळे व्हेंटिलिटर्सची संख्या हळूहळू वाढेल. व्हेंटिलिटर्स कमी असल्याची परिस्थिती आपल्या देशात सध्यातरी नाही”, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

लॉकडाऊन वाढवावा?

“लॉकडाऊनचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नये. हा निर्णय शास्त्रोक्त पद्धतीने घ्यावा. केंद्र सरकारने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भावाचा आलेख चढता आहे की नाही हे पाहून 12 किंवा 13 एप्रिलला निर्णय घ्याला. सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे पार्शल लॉकडाऊन करावं. मात्र, शेतीच्या मालाला हमीभाव मिळावा. भाजीपालाची वाहतूक सुरुळीत चालू ठेवावी”, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

पीपीई किट म्हणजे काय?

पीपीई किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा उपकरण होय. एखाद्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षणसाठी पीपीई उपकरण वापरलं जातं. यात हातमोजे, पायमोजे, मास्क, गाऊन, डोक्याचं आणि डोळ्यांचं संरक्षणासाठी कव्हर, रेस्पिरेटर्स इत्यादींचा समावेश असतो.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.