Corona : कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स, पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात 18 नेत्यांना जबाबदारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे.

Corona : कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स, पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात 18 नेत्यांना जबाबदारी
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 12:51 PM

मुंबई : कोरोनाचे (Corona Virus) संकट दिवसेंदिवस गंभीर (Congress Task Force) होत चालले आहे. राज्यात रुग्णांची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे आता काँग्रेसने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची घोषणा (Congress Task Force) केली आहे. त्यासाठी 18 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे या टास्क फोर्सचे समन्वयक आहेत. या टास्क फोर्समध्ये खासदार राजीव सातव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह18 सदस्य आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख हे टास्क फोर्सचे सचिव आहेत.

या टास्कफोर्सच्या अंतर्गत विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात सामाजिक आणि आर्थिक परिणाम उपसमिती, आरोग्य उपसमिती, शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमिती आणि माध्यम, सोशल मीडिया आणि मदत कक्ष या उप समित्या कार्यरत असतील.

सामाजिक आणि आर्थिक परिणाम उपसमितीचे अध्यक्ष आमदार अमिन पटेल असतील. डॉ. रत्नाकर महाजन हे समन्वयक तर चित्रा बाथम सचिव आहेत. कोरोना संकटाचे समाजील विविध घटकांवर कोणते सामाजिक आणि आर्थिक परिणाम झाले याचा अभ्यास करुन यासंदर्भात काय उपायोजना कराव्यात याबाबत सरकारला सूचना करेल.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील  आरोग्य उपसमितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले असून माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव ह्या समन्वयक आणि डॉ. मनोज राका सचिव आहेत. ही उपसमिती वैद्यकीय सेवेचे अवलोकन करुन सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक असलेल्या सुविधांसंदर्भात सूचना करेल.

शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमितीच्या (Congress Task Force) अध्यक्षपदाची जबाबदारी माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी समन्वयक असतील. समितीच्या सचिव म्हणून अमर खानापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होते का ह्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या उपसमितीवर आहे.

तसेच माध्यम, सोशल मीडिया आणि मदत कक्ष या उपसमितीच्या अध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांची तर समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांची तर सचिवपदी श्रीनिवास बिक्कड यांची निवड करण्यात आली आहे. माध्यम आणि समाज माध्यमासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून राज्य सरकारने केलेल्या उपयोयोजनांना विविध माध्यमातून प्रसिद्धी देण्याचे तसेच केंद्र सरकारच्या योजनांमधील त्रुटी समोर आणण्याचे काम या उपसमितीकडून केले जाणार आहे. तसेच, प्रदेश काँग्रेसच्या मदत कक्षावर येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांची माहिती देण्याचे कामही हे उपसमिती करणार आहे. या उपसमित्यांचे अध्यक्ष हे सुद्धा टास्क फोर्सचे सदस्य असतील.

राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे, आवश्यकता असेल तेथे सूचना आणि मार्गदर्शन करणे, काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेले मदत कार्य गतीमान करणे, काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना कोविड-19 च्या लढ्यात मदत करणे, त्यांना अधिकाधिक सक्रीय करणे, कोविड-19 च्या संदर्भाने सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थिती याबाबत सातत्याने माहिती घेऊन साप्ताहिक अहवाल सादर करणे, ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबिनार आदी माध्यमातून ही टास्क फोर्स (Congress Task Force) कार्यरत राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.