Pune Lockdown : पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा थेट विरोध, नियम आणि अटींच्या आक्षेपाची यादी वाचली

पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला आहे.

Pune Lockdown : पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा थेट विरोध, नियम आणि अटींच्या आक्षेपाची यादी वाचली
भाजप खासदार गिरीश बापट यांचा पुण्यातील मिनी लॉकडाऊनमधील काही बाबींना विरोध
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 2:56 PM

पुणे : पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील मिनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवस अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला आहे. (BJP opposes mini lockdown in Pune, demands bus service to continue at 40% capacity)

‘बससेवा 40 टक्के क्षमतेनं सुरु ठेवा’

भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भुमिका मांडली. पुण्यात जे नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातील दोन-तीन गोष्टींना विरोध असल्याचं बापट यांनी सांगितलं. पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी केलीय. पीएमपीएमल बस बंद करण्यासही भाजपने विरोध दर्शवलाय. बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? असा प्रश्न विचारतानाच 40 टक्के क्षमतेनं पीएमपीएमएल बस सुरु ठेवण्याची मागणी बापट यांनी केलीय. हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या अशी मागणी भाजपनं केलीय. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपने मांडली आहे.

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे, हे चूक’

पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवं. लोकांना रेशन द्या. काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीकाही गिरीश बापट यांनी केलीय. तसंच संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला विरोध करताना रात्री 8 पासून संचारबंदी करा, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.

पुण्यात काय सुरु काय बंद?

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.

मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद

PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु

आठवडे बाजारही बंद

लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल.

केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

दिवसभर जमावबंदी

जिम सुरु राहणार

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार

शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत होणार

संबंधित बातम्या :

Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

पुण्यात मिनी लॉकडाऊन, दहावी-बारावी, MPSC परीक्षांचं काय?

BJP opposes mini lockdown in Pune, demands bus service to continue at 40% capacity

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.