AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना ‘साहिबजादे’ म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींवर शरद पवार बरसले; म्हणाले…

Sharad Pawar on PM Narendra Modi Statement About Rahul Gandhi : नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत. वाचा सविस्तर...

राहुल गांधींना 'साहिबजादे' म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींवर शरद पवार बरसले; म्हणाले...
| Updated on: Apr 30, 2024 | 3:34 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींवर टीका करताना नरेंद्र मोदींना काहीतरी वाटायला हवं, अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचाही दाखला दिला आहे. तसंच नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता असता कामा नये, असंही शरद पवार म्हणालेत.

शरद पवारांचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्यावर टीका करतात. साहिबजादे क्या करेंगे? नरेंद्र मोदींना कायतरी वाटायला हवं. राहुलच्या घरातील तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढं जावा. यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींने देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात साहिबजादे काय करणार?, असं शरद पवार म्हणालेत.

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी नरेंद्र मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगत आहेत. चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

‘त्या’ टीकेला शरद पवारांचं उत्तर

माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकती आहे, असं म्हणाले. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, असं मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन, असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय. ते सत्तेचा दुरूपयोग करतात. मुळात सत्ता ही जनहिताच्या कामासाठी करायची असते. याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे, असं शरद पवार म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.