AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab : विद्येच्या माहेरघरात गुंडांच्या 70 गँग; पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे, अनिल परबांच्या आरोपांनी सुरक्षा ऐरणीवर, मुख्यमंत्र्यांना काय दिला इशारा

Pune Crime 70 Goons Gangs : विद्येच्या माहेर घरातच गुंडांच्या 70 गँग असल्याचा गंभीर आरोप उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी केला. त्यांनी पोलिस जीवाच्या आकांताने त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही मंत्री त्यांना पाठीशी घालत असल्याचा मोठा बॉम्ब टाकला.

Anil Parab : विद्येच्या माहेरघरात गुंडांच्या 70 गँग; पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे, अनिल परबांच्या आरोपांनी सुरक्षा ऐरणीवर, मुख्यमंत्र्यांना काय दिला इशारा
अनिल परब
| Updated on: Oct 09, 2025 | 12:43 PM
Share

Pune Crime : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुंडांच्या 70 गँग असल्याचा बॉम्ब उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी टाकला. त्यांनी आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डान्सबार चालवणाऱ्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून का बसलेत? हेच कळत नसल्याचा टोला परब यांनी लगावला. त्यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे जिल्ह्यात गँगवार

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहे. कोयता गँग आहे. पुणे जिल्ह्यात ७० गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे करण्यासाठी जे लागत, म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं. हे सिद्ध झालं आहे. काही दिवसापासून निलेश घायवळ प्रकरण आपल्या माध्यमात चर्चा आहे. हा गुंड सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर गेला आहे. त्याचे गुंड थैमान घालत आहेत. रस्त्यावर उतरलेल्या माणसांवर गोळीबार करत आहेत. त्याच्या भावाला सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केला आहे. शस्त्र परवाना घेण्याची पद्धत असते. अर्ज करावा लागतो. तो स्क्रूनिटीला जातो. स्थानिक पोलीस त्याची चौकशी करतात. तरीही तो पळून जातो, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला.

कोर्टाशिवाय पर्याय राहणार नाही

योगेश कदम यांच्यावर कुणाचाही दबाव असेल, माझा साधा प्रश्न आहे. कुणाचाही दबाव असेल. मी मंत्री आहे. अर्धन्यायिक जज आहे. एखादी जजमेंट देताना मी विचार केला पाहिजे. पोलिसांचा रिपोर्ट आहे. तो गुंड आहे. गुंडाचा भाऊ आहे. समाजविरोधी कृत्यात तो आहे. म्हणून आम्ही परवाना नाकारत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी परवाना नाकारला तेव्हाही तो कोर्टाच्या गुन्ह्यातून दोषमुक्त होता ना. पोलिसांनी नाकारला त्याच ग्राऊंडवर कदम यांनीही परवाना नाकारायला हवा होता असे ते म्हणाले. तर योगेश कदम यांच्या सर्व गैरकृत्याबाबत कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमा जपत आहेत. पण त्यांचे मंत्री असे कृत्य करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोर्टाचे ताशेरे येण्यापूर्वची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तर पुण्यातील गुन्हेगारीविरोधात आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा अनिल परब यांनी दिला.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.