Electric Car एकदम स्वस्तात, पेट्रोल कारच्या किंमतीत करा खरेदी, काय म्हणाले नितीन गडकरी?
Electric Car-Petrol Car Price : इलेक्ट्रिक कार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. पेट्रोल कारप्रमाणेच इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करता येईल. यासाठी फारकाळ वाट पाहावी लागणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले काय?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रिक वाहनांविषयी मोठे भाष्य केले आहे. इलेक्ट्रिक कार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. पेट्रोल कारच्या किंमतीत ईव्ही कार (EV Car) खरेदी करता येईल. या कार 4 ते 6 महिन्यांत स्वस्त होतील आणि पेट्रोल कारच्या किंमतीत मिळतील असा दावा गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांचे हे वक्तव्य भारतीय ऑटो सेक्टरसाठी गेम चेंजर मानल्या जात आहे. यामुळे ईव्हीचे मार्केट आणि ईव्ही शेअर रॉकेट भरारी घेतील हे नक्की.
ईव्ही आता लावा दारी
ईव्ही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असल्याचे वक्तव्य मंत्री नितीन गडकरी यांनी 20 व्या FICCI हायर एज्युकेशन समिट 2025 मध्ये सांगितले की, काही महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांचा खर्च पेट्रोल वाहना इतका असेल. नवीन तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि सरकारच्या ई-मोबॅलिटी धोरणांमुळे ईव्हीच्या खर्चात मोठी कपात झाली आहे. भारतात ईव्ही कार खरेदीची संख्या अधिक वाढली आहे. वाहन खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे सोपे होणार आहे.
पेट्रोल आयातीवर 22 लाख कोटींचा खर्च
गडकरी यांच्या मते भारत दरवर्षी पेट्रोल आयातीवर 22 लाख कोटी रुपये खर्च करतो. हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार आहे. त्यांच्या मते ईव्हीच्या खरेदीमुळे प्रदुषण आटोक्यात आणण्यासच मदत होणार नाही तर यामुळे भारतीय गंगाजळी वाचेल. भारताचा होणारा मोठा खर्च वाचेल. भारताचा इंधनावरील खर्च वाचेल म्हणजे मोठी बचत होईल. ईव्ही मार्केटमध्ये बुमिंग येईल.
जगातील नंबर वन ऑटो हब होण्याचे लक्ष्य
गडकरींनी सांगितले की जेव्हा त्यांनी मंत्रालयाचा कारभार हाती घेतला. तेव्हा भारताचा ऑटो उद्योग 14 लाख कोटी रुपये होता. तो आता वाढून 22 लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. पाच वर्षात वाहन उद्योगात मोठी झेप घेतली. येत्या पाच वर्षांत ऑटो सेक्टरमध्ये भारत जगात नंबर वन होईल असा दावा गडकरी यांनी दिला. सध्या अमेरिका 78 लाख कोटी तर चीन 47 लाख कोटीसह ऑटो उद्योगासह आघाडीवर आहेत. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला मोठी कसरत करावी लागणार आहे.
