Rajgad Fort : पुण्यातल्या राजगड किल्ल्यावर महिनापूर्वी बसवलेला लाकडी दरवाजा कोसळला

विनय जगताप

विनय जगताप | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jun 19, 2022 | 10:43 PM

राजगड किल्लावर लाकडी दरवाजे बसवण्याची बातमी ज्या वेळेला कळली त्या वेळेला साळुंके यांनी एक जागृत शिवभक्त म्हणून, महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याच्या संचालकांना एक प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारला होता की, गडाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का ..?? त्याच्यावर पुरातत्व खात्याने वेळ मारून नेण्यासाठी उत्तर दिलं आणि दरवाजे बसविण्यास परवानगी दिली, असा आरोप खोपडेंनी केला आहे.

Rajgad Fort : पुण्यातल्या राजगड किल्ल्यावर महिनापूर्वी बसवलेला लाकडी दरवाजा कोसळला
राजगड किल्ल्यावर महिनापूर्वी बसवलेला लाकडी दरवाजा कोसळला
Image Credit source: TV9

पुणे : पुण्यातल्या वेल्हा तालुक्यातील राजगड (Rajgad) किल्ल्यावर महिनापूर्वी बसवलेला लाकडी दरवाजा (Wooden Door) कोसळला आहे. सुदैवाने यावेळी दरवाजा जवळ कोणीही नसल्यानं यात कोणालाही दुखापत (Injured) झालेली नाही. मात्र यामुळं पुरातत्व खात्याचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. शिवप्रेमी विकास साळुंके यांनी माहितीच्या अधिकाराखाली वारंवार पुरातत्व खात्याबरोबर पत्रव्यवहार करूनही गडाचं स्ट्रॅक्चरलं ऑडिट न करता, दरवाजे बसवल्याचा आरोप शिवभक्त सचिन खोपडेंनी केला आहे. महिनापूर्वीचं गडावर सह्याद्री प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या महादुर्गारपण सोहळ्या दरम्यान गडावर दरवाजे बसविण्यात आले होते. मात्र गडाच स्ट्रक्चरलं ऑडिट न करता, यावर माहितीच्या अधिकाराखाली साळुंके यांनी पत्रव्यवहार करूनही वेळ मारून नेत, पुरातन खात्यानं दरवाजा बसविण्याची परवानगी दिल्याचा आरोप शिवप्रेमी सचिन खोपडे यांनी केला आहे.

पुरातत्व खात्याने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचा शिवभक्तांचा आरोप

राजगड किल्लावर लाकडी दरवाजे बसवण्याची बातमी ज्या वेळेला कळली त्या वेळेला साळुंके यांनी एक जागृत शिवभक्त म्हणून, महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याच्या संचालकांना एक प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारला होता की, गडाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का ..?? त्याच्यावर पुरातत्व खात्याने वेळ मारून नेण्यासाठी उत्तर दिलं आणि दरवाजे बसविण्यास परवानगी दिली, असा आरोप खोपडेंनी केला आहे. गडाचं स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यामुळे अवशेषांच्या मजबुतीकरणाचा अहवाल हा प्रसिद्ध करण्याची मागणी अर्जातून केली असताना तो अहवाल सुद्धा प्रकाशित केला नाही किंवा शिवभक्तांना दाखवला नाही. त्यातील जबाबदारी न घेता आणि पुरातत्व खात्याने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही, असा आरोपही शिवभक्तांनी केला आहे.

राजगडावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण आणि नियमन केलेले नाही. परिणामी आज दरवाजा ज्या पुरावशेषांवर लावला होता ते पुरावशेष आज कोसळले. याला सर्वस्वी जबाबदार हे आंधळेपणाने परवानगी देणारे पुरातत्त्व खाते असल्याचं मतं शिवप्रेमिंनी व्यक्त केलंय. वारंवार अर्ज करून सुद्धा कोणत्याही नियमांचे पालन न करता पुरातत्व खातं दरवाजे बसवण्याच्या परवानगी का देत आहे. गडाचे अवशेष जीर्ण झालेत. कमकुवत झालेत त्यांना दरवाजांचा भार पेलवेल का…?? असले साधे प्रश्न पुरातत्व खात्याला पडले नाहीत का…?? महाराष्ट्र राज्यातील पुरातत्व खाते नेमक्या कुणाच्या लांगुलचालनासाठी पुरातत्व संवर्धनाचे नियम धाब्यावर बसवत आहे…?? गडाच्या अवशेषांची नेमकी जबाबदारी कुणाची ?, असे प्रश्न सुद्धा शिवप्रेमींकडून उपस्थित केले जातायत. (A wooden door installed on Rajgad fort in Pune a month ago collapsed)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI