AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ABVP चं पुणे विद्यापीठात आंदोलन, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घोषणाबाजी

अभाविपनं व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये कोणत्याही विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा होत नसल्याचा आरोप केला. (ABVP Protest at SPPU Pune)

ABVP चं पुणे विद्यापीठात आंदोलन, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घोषणाबाजी
अभाविपचं आंदोलन
| Updated on: Feb 22, 2021 | 2:03 PM
Share

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा जाहीर निषेध करण्यात आला. अभाविपचे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये घुसून आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली. (ABVP protest in Savitribai Phule Pune University Management Council meeting)

विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा नसल्याचा आरोप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये कोणत्याही विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा नाही, असा आरोप करण्यात आला. गेली 6 महिने परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहे त्याच्यावर आजून कोणताही निर्णय नाही. हा आरोप देखील करण्यात आला.

स्वायत्तेतवर गदा तरी विद्यापीठ गप्प का?

विद्यापीठाच्या स्वायत्तत्तेवरती शासनाकडून गदा आणली जात आहे आणि विद्यापीठ यावर गप्प आहे, असा सवालही अभाविपनं केला. विद्यार्थ्यांच्या पैशांवर राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठां ऑनलाइन परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करण्याविषयी या बैठकीत निर्णय करावा अन्यथा ही बैठक करण्याचा अधिकार नाही, अशी टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. (ABVP protest in Savitribai Phule Pune University Management Council meeting)

अभाविपचं यापूर्वीही आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षांमध्ये येणाऱ्या अडचणींवरुन केलेले पुंगी बजाव आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतील विद्यार्थी परिषदेने 5 तासांहून अधिक काळ पुंगी बजाव आंदोलन केलं. 10 नोव्हेंबरपर्यंत 95 टक्के निकाल लवाण्यात येतील. कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ झाले आहेत. त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.

संबंधित बातम्या

online exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, परीक्षेची नवी तारीख जाहीर

पुणे विद्यापीठात ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा, प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटसाठी ‘ओटीपी’च मिळाला नाही

‘लिटिल मोअर’ला नो मोअर चान्स! ऑनलाईन परीक्षा घोळामुळे मुंबई विद्यापीठाने काम काढून घेतलं!

(ABVP protest in Savitribai Phule Pune University Management Council meeting)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...