AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro | पुणे महामेट्रोच्या कामाला वेग ; वर्षा अखेरीस भुयारी मार्गांसह इतर स्थानकांवरही मेट्रो धावणार

भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण भूयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे पूर्ण झाले आहेत. या 5 किलोमीटरच्या भूयारी मार्गात 5 स्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर स्थानकाचे काम गतीने होत आहे.

Pune Metro | पुणे महामेट्रोच्या कामाला वेग ; वर्षा अखेरीस भुयारी मार्गांसह इतर स्थानकांवरही मेट्रो धावणार
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 17, 2022 | 12:59 PM
Share

पुणे – शहरातील गरवारे कॉलेज ते वनाजपर्यंत नुकतीच मेट्रोची(Pune  Metro )  सेवा सुरु झाली आहे. मेट्रोच्या या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लाखाहून अधिक नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. शहरातील मेट्रो जाळ्याच्या (Metro Network) विस्तार होत असताना काही स्थानके भुयारी आहेत. येत्या वर्षात ही भुयारी स्थानके (Underground stations) वगळता गरवारे महाविद्यालय ते रामवाडी तसेच फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन्ही मेट्रोमार्गांचे संपूर्ण काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे आवाहन महामेट्रोने आता घेतले आहे. यामध्ये गरवारे महाविद्यालय ते महापालिका व फुगेवाडीच्या पुढे आणखी 5 किलोमीटपर्यंतचे काम प्राधान्याने करण्यावर भर दिला जाणार आहे.

या बोगद्याचे काम पूर्ण

भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 5 किलोमीटरचा मार्ग पूर्ण भूयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे पूर्ण झाले आहेत. या 5 किलोमीटरच्या भूयारी मार्गात 5 स्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर स्थानकाचे काम गतीने होत आहे. स्थानकात दोन्ही बोगदे एकत्र होतात व स्थानकाचे अंतर संपले की पुन्हा स्वतंत्र होतात. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट या स्थानकांची कामे सुरू आहेत.

8 हजार कामगार कार्यरत

मेट्रोच्या कामावर सध्या 8  हजार कामगार काम करत आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांना प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यासगळ्यामुळे महामेट्रोचा कामाचा उत्साहही दुणावला आहे. त्यामुळेच आता मेट्रो मार्गाची पुढील कामे गतीने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोना टाळेबंदीत मेट्रोच्या कामाचे काही महिने वाया गेले, मात्र तरीही पहिल्या दोन प्राधान्य मार्गांचे काम गतीने पूर्ण करण्यात आले व ते सुरूही झाले. आताही नियोजनबद्ध काम होत असून संपूर्णच काम संपवण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे असे महामेट्रोचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी म्हटले आहे.

Crop Insurance : खरिपापूर्वीच पीकविमा योजनेचा निर्णय, केंद्राबरोबर की राज्याची स्वतंत्र यंत्रणा..!

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा ‘बोल्ड वर्क आऊट’, ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

TV9 Marathi no.1 | महाराष्ट्रात ‘tv9 मराठी’चा दबदबा, बार्क रेटिंगमध्ये अव्वल

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.