AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट! रोहित सिंगला अटक होणार? जय पवार यांचे मोठे संकेत

Jay Pawar on Rohit Singh: आज राहुरीसह बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. जय पवार यांच्या आजच्या विधानातून मोठे संकेत मिळाले आहे. काय म्हणाले जय पवार?

Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट! रोहित सिंगला अटक होणार? जय पवार यांचे मोठे संकेत
जय पवार, रोहित सिंग, व्ही के सिंग व्हीएस आर कंपनी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 23, 2026 | 8:38 AM
Share

Jay Pawar on Rohit Singh: माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचा विमान अपघात की घातपात यावरून अजूनही मोठा वाद आहे. आमदार रोहित पवार यांनी हा घातपात असल्याचा दावा केला आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनीही जाहीरपणे तीच भूमिका मांडली आहे. VSR Company चा मालक व्ही. के. सिंग आणि त्याचा मुलगा रोहित सिंग यांना अटक करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. यापूर्वी व्ही. के. सिंग यांची पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. आज जय पवार यांनी याप्रकरणात मोठी अपडेट दिली आहे.

रोहित सिंगला अटक करा

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याचा मुलगा रोहित सिंग याला अटक व्हायलाच हवी अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना त्यांनी टीव्ही ९ मराठीला ही प्रतिक्रिया दिली. दादांच्या विमान अपघाताचा तपास CID कडे आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यात सर्व चित्र समोर येईल असे मोठे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोठी कारवाई होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

यापूर्वी व्ही. के सिंग यांची चौकशी

अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी यापूर्वी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांची सीआयडीकडून सखोल चौकशी करण्यात आली होती. 5 मार्च 2026 रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात दोघांची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती. पण या चौकशी दरम्यान या दोघांनाही व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांची मोठी बडदास्त ठेवण्यात आल्याचे तसेच त्यांनी क्रिकेटच्या सामन्याचाही आनंद लुटल्याचा आरोप पवार यांनी केला होती. तर जय पवार यांनी रोहित सिंग यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जाहीर सभेत या अपघाताविषयी शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याविषयीची मागणी केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याचे भाष्य केले.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?