चंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजितदादांची टीका

जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजितदादांची टीका
ajit pawar
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:53 PM

कोल्हापूर: जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. (ajit pawar slams chandrakant patil over GST issue)

अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्देवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. ते आकडे आम्हाला माहीत आहे. आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रंच त्यांना दिलं आहे. त्यातही हा आकडा दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं. काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला पवार यांनी चंद्रकांतदादांना लगावला.

15 जूननंतर म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन येतील

म्युकरमायकोसिस आजारामुळे मृतांची आकडेवारी वाढत आहे. ही वस्तुस्थिती आहे. या आजारावरील सर्व इंजेक्शन्स केंद्राच्या अख्त्यारीत आहेत. रुग्णांच्या प्रमाणात ही इंजेक्शन मिळावीत अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं. 15 जूननंतर ही इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणावर मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा

कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा. उलट कोरोनाचा संसर्ग वाढला तर कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असं सांगतानाच कोल्हापुरातील 12 जिल्ह्यात जिथे लसीकरण झालंय, तिथे पॉझिटिव्हिटी रेट थोडा कमी आहे. त्यामुळे लसीकरणावर भर असेल. जशी लस उपलब्ध होईल, तशी ती उपलब्ध करुन दिली जाईल, असं ते म्हणाले. (ajit pawar slams chandrakant patil over GST issue)

संबंधित बातम्या:

कोल्हापूरकरांनो, आम्हाला हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण?

“ज्या वारकऱ्यांनी दोन डोस घेतले असतील, त्यांनाच पंढरपुरात प्रवेश द्या”

(ajit pawar slams chandrakant patil over GST issue)

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.